केएल राहुल पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका, तर ऋषभ पंत विनाशकारी; पाकिस्तानच्या बॅटिंग गुरुचा इशारा

टी -20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा माजी सलमावीर मॅथ्यू हेडन याची फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. तो संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी फलंदाजांना फलंदाजीचे धडे देताना दिसेल.

केएल राहुल पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका, तर ऋषभ पंत विनाशकारी; पाकिस्तानच्या बॅटिंग गुरुचा इशारा
KL Rahul - Rishabh Pant
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:56 AM

मुंबई : टी -20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा माजी सलमावीर मॅथ्यू हेडन याची फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. तो संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी फलंदाजांना फलंदाजीचे धडे देताना दिसेल. त्यांने कामही सुरू केले आहे. पण, या दरम्यान, त्याने एक महत्त्वाचे विधान केले आहे. भारतीय फलंदाजांची ताकद पाहून हेडन चकित झाला आहे. त्याने दोन फलंदाजांचा विशेष उल्लेख केला. हेडन म्हणाला की, केएल राहुल हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका आहे. तर ऋषभ पंतदेखील धोकादायक फलंदाज असल्याचे त्याने म्हटले आहे. विध्वसंक फलंदाज अशा शब्दात त्याने पंतचे वर्णन केले आहे. (India vs Pakistan T20 World Cup 2021: KL Rahul and Rishabh Pant is BIG threat, says Matthew Hayden)

मॅथ्यू हेडन म्हणाला, मी गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटचे बारकाईने निरीक्षण करत आहे. आणि, मी हे सांगू इच्छितो की, केएल राहुलला खेळताना मी जितके ओळखले आहे, तो पाकिस्तानसाठी मोठा धोका असू शकतो. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये त्याचा प्रभाव आश्चर्यकारक आहे. माजी डावखुरा ऑस्ट्रेलियन सलामीवीर पुढे म्हणाला, “जर केएल राहुल पाकिस्तानसाठी धोका बनू शकतो, तर ऋषभ पंत विनाशकारी ठरू शकतो. त्याची खेळाकडे पाहण्याची वृत्ती जबरदस्त आहे. तो गोलंदाजी आक्रमण नष्ट करण्यासाठी प्रत्येक संधीचा विचार करतो.

केएल राहुलचा सध्याचा फॉर्म धोकादायक

पाकिस्तानचा फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडनने पाकिस्तानला केएल राहुलचा मोठा धोका असल्याचे कारणही आहे. वास्तविक, यामागील कारण म्हणजे आयपीएल 2021 मधील त्याची कामगिरी, जी त्याने समालोचन करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. IPL 2021 च्या खेळपट्टीवर, केएल राहुलने फक्त 13 सामन्यांमध्ये 626 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 138 च्या वर होता. त्याचबरोबर या लीगमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही तोच होता. केएल राहुलने स्पर्धेत एकूण 30 षटकार ठोकले. केएल राहुलने टी-20 विश्वचषक सराव सामन्यांमध्ये आयपीएल 2021 मधील ही कामगिरी कायम ठेवली आहे, जी पाकिस्तानशी सामना करण्यापूर्वी टीम इंडियासाठी चांगली चिन्हे आहेत.

ऋषभ पंत हा क्लीन हिटर आहे : हेडन

ऋषभ पंत हा चेंडूचा क्लीन हिटर मानला जातो. अनेक उत्कृष्ट चेंडू तो सहज सीमापार भिरकाऊ शकतो. आयपीएल 2021 आणि सराव सामन्यात तो षटकारांसह गेम फिनिश करताना दिसला आहे. तो बऱ्याच वेळा एका हाताने चौकार किंवा षटकार लगावतो. त्याची आक्रमक वृत्ती त्याला विनाशकारी फलंदाज बनवते.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: ओमानला मात देत स्कॉटलंडची ऐतिहासिक कामगिरी, सुपर 12 मध्ये मिळवली एन्ट्री, आता सामना भारताशी

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

IPL 2022 मध्ये कोणते 3 खेळाडू मुंबई इंडियन्स करणार रिटेन?, दोन मॅच विनर्सचं भविष्य धोक्यात

(India vs Pakistan T20 World Cup 2021: KL Rahul and Rishabh Pant is BIG threat, says Matthew Hayden)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.