India vs Pakistan Toss result: भारताला मोठी धावसंख्या करणं अनिवार्य, पाकिस्तानकडे प्रथम गोलंदाजी
भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून (24 ऑक्टोबर) आपली मोहिम सुरु करत आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.
T20 World Cup 2021 : भारत आणि पाकिस्तान या बहुप्रतिक्षित सामन्याला आता काही वेळात सुरुवात होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आहे. पाकिस्तानच्या संघाने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू प्रथम फलंदाजीला येणार आहेत. दरम्यान पाकिस्तान बोलिगं अटॅक दमदार असल्याने भारताला मोठी धावसंख्या करणं अनिवार्य आहे.
दोन्ही संघानी आपले अंतिम 11 खेळाडूही जाहीर केले आहेत. यावेळी भारताने 5 गोलंदाज घेतले आहेत. ज्यामध्ये दोन फिरकीपटूंसह तीन वेगवान गोलंदाजाना सामिल करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस्ट्री स्पीनर वरुणला संघात संधी देण्यात आली आहे.
भारताचे अंतिम 11
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तानचे अंतिम 11
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.
इतर बातम्या
(India vs Pakistan Toss result: Pakistan Won Toss and Elected Bowl First)