IND vs SCOT, T20 world Cup 2021: स्कॉटलंड-टीम इंडिया पहिल्यांदाच भिडणार, भारताला मोठ्या विजयाची गरज

T20 विश्वचषक 2021 मध्ये आज टीम इंडियाचा सामना स्कॉटलंडशी होत आहे. भारतासाठी या सामन्यात तितकाच मोठा विजय गरजेचा आहे, जसा विजय भारताने अफगाणिस्तानविरुद्ध मिळवला होता.

IND vs SCOT, T20 world Cup 2021: स्कॉटलंड-टीम इंडिया पहिल्यांदाच भिडणार, भारताला मोठ्या विजयाची गरज
India vs Scotland
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 12:19 PM

मुंबई : T20 विश्वचषक 2021 मध्ये आज टीम इंडियाचा सामना स्कॉटलंडशी होत आहे. भारतासाठी या सामन्यात तितकाच मोठा विजय गरजेचा आहे, जसा विजय भारताने अफगाणिस्तानविरुद्ध मिळवला होता. त्यानंतर पुढचा सामनादेखील मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, सोबत अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करावा अशी प्रार्थना करावी लागील. त्यानंतरच भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. (India vs Scotland T20 World Cup 2021 match Prediction, Previous Match Stats)

भारत आणि स्कॉटलंड संघांमधील हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. दुबईतील या स्पर्धेतील भारताचा हा तिसरा सामना असेल. याआधी भारताने येथे खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला धूळ चारली होती.

भारत आणि स्कॉटलंड (India vs Scotland) हे दोन्ही संघ आज स्पर्धेतील चौथा सामना खेळतील. याआधी झालेल्या 3 सामन्यांमध्ये भारताने 1 जिंकला आहे आणि 2 गमावले आहेत आणि ब गटाच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी स्कॉटलंड संघाच्या विजयाचे खाते अद्याप उघडलेले नाही. या संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व 3 सामने गमावले आहेत. त्यामुळेच गुणतालिकेत त्यांचे स्थान तळाला असून ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनही बाहेर आहेत.

स्कॉटलंड-टीम इंडिया पहिल्यांदाच भिडणार

टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टीम इंडिया स्कॉटलंडच्या आव्हानाचा सामना करताना दिसणार आहे. यापूर्वी 2007 मध्ये T20 विश्वचषकाच्या पहिल्या एडिशनमध्ये दोन्ही संघांमधील सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसामुळे एकही चेंडू न टाकता तो सामना रद्द करण्यात आला होता. टीम इंडियाचा स्कॉटलंडवर वरचष्मा आहे. मात्र दुबईत भारतीय संघाची आकडेवारी चांगली नाही. टीम इंडियाने दुबईत एकही टी-20 सामना जिंकलेला नाही. आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या 2 टी-20 सामन्यांमध्ये त्याला तोंडघशी पडावे लागले आहे. साहजिकच भारतीय संघावर मानसिक दडपण दिसून येईल, त्याचा फायदा स्कॉटलंड संघाला घेता येईल.

टीम इंडियात नो चेंज, स्कॉटलंडमध्ये एक बदल शक्य

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास टीम इंडियामध्ये कोणताही बदल करण्यास वाव नाही. टीम इंडिया त्यांच्या विनिंग टीम कॉम्बिनेशनसह मैदानात उतरेल. त्याचवेळी स्कॉटलंड संघातील वेगवान गोलंदाज जोश दावे मांडीच्या दुखापतीमुळे या सामन्यात सहभागी होणार नाही. त्याच्या जागी मायकेल जोन्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.

इतर बातम्या

T20 वर्ल्डकपनंतर 18 वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम देणार, ICC च्या 3 ट्रॉफी जिंकणाऱ्या चॅम्पियन्सची मोठी घोषणा

T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर

VIDEO: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानातचं थिरकला विराट, ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर डान्सचा व्हिडीओ पाहाच

(India vs Scotland T20 World Cup 2021 match Prediction, Previous Match Stats)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.