India vs Scotland T20 world cup 2021: भारताचा मोठा विजय, 39 चेंडूत संपवला सामना, स्कॉटलंडवर 8 विकेट्सनी विजय
India vs Scotland T20 world cup: विश्वचषकात सलग दोन पराभवांमुळे निराश टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं असलं तरी पुढील फेरीत जाण्यासाठी अजून बरीच आव्हानं आहेत. त्यातील एक आव्हान आजचा स्कॉटलंड विरुद्धचा सामना होतं. पण हा सामना 8 विकेट्सने जिंकून भारताने हे आव्हान पूर्ण केलं आहे.
यंदाचा विश्वचषक भारतीय क्रिकेट संघासाठी तसा खास नसल्याचंच दिसून येत होतं. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला दारुण पराभव देखील स्वीकारावा लागला होता. पण तिसऱ्या सामन्यात अफगाणस्तानला 66 धावांनी मात देत भारताने पुनरागमन केलं. त्यानंतर आजच्या सामन्यात स्कॉटलंडला मोठ्या फरकाने नमवल्यास भारताला गुणतालिकेत फायदा होणार होता. तशीच कामगिरी करत भारताने 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला आहे. केवळ 39 चेंडूत भारताने लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकलेल्याने विराटने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय़ अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी बरोबर करु दाखवला. ज्यामुळे स्कॉटलंडला संघ केवळ 85 धावांमध्ये सर्वबाद झाला. ज्यानंतर राहुल आणि रोहितने उत्तम सुरुवात केली. राहुलने 18 चेंडूत 50 धावा केल्या. तर रोहितनेही 30 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.
टी20 विश्वचषकातील सामन्यांचा स्कोर आणि गुणतालिका सविस्तर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
Key Events
अवघ्या 86 धावांचं आव्हान भारतासमोर होतं. जे पूर्ण करण्यासाठी भारताने केवळ 39 चेंडूच घेतलं. यात सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी 80 धावा केल्या. दोघांच्या बॅट अक्षरश: आग ओकत होत्या. रोहितने 16 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकार ठोकत 30 धावा केल्या. तर राहुलने विश्वचषकातील वेगवान अर्धशतक ठोकत 19 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकार ठोकत 50 धावा केल्या. राहुल बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 4 धावांची गरज होती. त्यावेळी फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने षटकार खेचत संघाचा विजय पक्का केला.
विश्वचषकाच्या एकाही सामन्यात भारताला नाणेफेक जिंकण्यात यश आलं नव्हतं. पण आज विराटच्या वाढदिवसादिवशी त्याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय़ अगदी बरोबर असल्याचं दाखवत वेगवान आणि फिरकी गोलंदाजीने स्कॉटलंडच्या फलंदाजांना चक्रावून सोडलं. भारताकडून जाडेजाने आणि शमी यांनी प्रत्येकी 3, तर बुमराहने 2 आणि आश्विनने एक विकेट घेतली. तर शमीच्याच ओव्हरला इशानने एका गड्याला रनआउट देखील केलं. ज्यामुळे स्कॉटलंडचा संघ केवळ 85 धावाच करु शकला. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा सलामीवीर मुन्सीने 24 आणि लीस्कने 21 इतक्याच केल्या.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs SCO: षटकार ठोकत सूर्याने फिनीश केला सामना.
सूर्यकुमार यादवने षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला आहे. भारताने 8 विकेट्सने सामना जिंकला आहे.
-
IND vs SCO: अर्धशतक ठोकून राहुल बाद
विजयासाठी अवघ्या 4 धावांची गरज असताना केएल राहुल झेलबाद झाला आहे.
-
-
IND vs SCO: 18 चेंडूत केएल राहुलचं अर्धशतक
धडाकेबाज फलंदाजी करत केएल राहुलने केवळ 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
-
IND vs SCO: रोहित पायचीत
भारताने दमदार फलंदाजी सुरुच ठेवली असताना रोहित मात्र मोठा शॉट खेळायला गेला आणि पायचीत झाला. स्कॉटलंडच्या व्हीलने त्याला बाद केलं आहे.
-
IND vs SCO: चौथ्या षटकातचं भारताचं अर्धशतक
4 ओव्हरमध्येच भारताने 50 धावा पूर्ण केल्या आहेत. भारताच्या 53 धावांमध्ये दोन्ही सलामीवीरांनी 26-26 धावा केल्या आहेत.
-
-
IND vs SCO: केएल राहुल ON FIRE
तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवर राहुलने चौकार, षटकार ठोकून सुरुवात केली आहे.
-
IND vs SCO: भारताची दमदार सुरुवात
भारताने दमदार सुरुवात करत पहिल्या दोन षटकातचं 23 धावा केल्या आहेत. राहुलने खास हीटींग करण्यास सुरुवात केली आहे.
-
IND vs SCO: बुमराहने टीपला शेवटचा बळी
वॉटला बाद करत बुमराहने स्कॉटलंडच्या शेवटच्या गड्यालाही तंबूत धाडलं आहे. त्यामुळे त्यांचा डाव 85 वर आटोपला असून भारताला विजयासाठी केवळ 86 धावांची गरज आहे.
-
IND vs SCO: शमीच्या षटकात 3 चेंडूवर 3 विकेट
पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत, दुसऱ्या चेंडूवर धावचीत विकेटनंतर शमीच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने एव्हान्स याला त्रिफळाचीत केलं आहे.
-
IND vs SCO: इशनची चपळाई, शरीफ शून्यावर बाद
शमीने पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवरच नुकताच फलंदाजीला आलेला शरीफ बाद झाला. यावेळी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आलेल्या इशान किशनने शरीफला धावचीत केलं आहे.
-
IND vs SCO: स्कॉटलंडचा 7 वा गडी बाद
मोहम्मद शमीने दुसरी विकेट मिळवत स्कॉटलंडच्या मॅक्लॉयड याला बाद केलं आहे. शमीच्या चेंडूवर मॅक्लॉयड त्रिफळाचीत झाला आहे.
-
IND vs SCO: आश्विनने बाद केला स्कॉटलंडचा 6 वा गडी
आर आश्विनने 14 व्या षटकात स्कॉटलंडच्या ख्रिसला बाद केलं आहे. सीमारेषेजवळ हार्दीकने कॅच घेतली आहे.
-
IND vs SCO: जाडेजाची जादू सुरुच
जाडेजानी अप्रतिम गोलंदाजी सुरुच ठेवली आहे. त्याने सामन्यातील तिसरा विकेट मिळवला आहे. चांगल्या लयीत असलेल्या लिस्कला जाडेजाने पायचीत केले आहे.
-
IND vs SCO: लिस्कची फटकेबाजी
स्कॉटलंडचा संघ अडचणीत असताना लिस्क याने शमीच्या ओव्हरमध्ये एक चौैकार आणि षटकार ठोकत डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
-
IND vs SCO: प्रतिक्षेनंतर स्कॉटलंडच्या खात्यात चौकार
एकामागोमाग एक विकेट पडत असताना अखेर 10 व्या षटकात लिस्क याने वरुणच्या चेंडूवर चौकार लगावला आहे.
-
IND vs SCO: जाडेजाच्या एकाच षटकात दोन विकेट्स
जाडेजाने एकाच षटकात दुसरी विकेटही मिळवली आहे. जाडेजाच्या चेंडूवर मॅथ्यू क्रॉस हा पायचीत झाला आहे.
-
IND vs SCO: जाडेजाची जादूगरी, स्कॉटलंडचा तिसरा गडी बाद
अगदी जादूई चेंडू टाकत भारताचा अष्टपैलू फिरकीपटू रवींद्र जाडेजाने स्कॉटलंडचा तिसरा गडी बाद केला आहे. त्याने बर्निंगटन याला शून्यावर बाद केलं आहे.
-
IND vs SCO: हार्दीकची उत्तम कॅच, स्कॉटलंडला दुसरा झटका
स्कॉटलंडचा सलामीवीर जॉर्ड मुन्सी उत्तम फलंदाजी करताना दिसत होता. पण त्याचीच विकेट मोहम्मद शमीने घेतली आहे. हार्दीकने त्याचा झेल घेतला आहे.
-
IND vs SCO: भारताची उत्तम गोलंदाजी
भारतीय गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करत असून 5 ओव्हरनंतर स्कॉटलंडचा स्कोर केवळ 27 धावा असून त्यांनी एक गडीही गमावला आहे.
-
IND vs SCO: भारताला पहिलं यश
तिसऱ्या षटकात बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. स्कॉटलंडचा कर्णधार कायल कोटजेर याला बुमराहने त्रिफळाचीत केलं आहे.
-
IND vs SCO: सामन्यातील पहिला चौकार
सामन्यातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये मुन्से याने चौकार लगावला आहे. दोन ओव्हरनंतर स्कॉटलंडचा स्कोर 13 झाला आहे.
-
IND vs SCO: पहिल्या षटकात पहिला षटकार
पहिली ओव्हर बुमराहने उत्तम टाकली. पण अखेरच्या चेंडूवर मुन्सीने षटकार खेचत ओव्हरमध्ये एकून 8 स्कॉलंडच्या नावे केल्या.
-
IND vs SCO: सामन्याला सुरुवात
स्कॉटलंड विरुद्ध भारत सामन्याला सुरुवात झाली असून स्कॉटलंडचे सलामीवीर मैदानात आहेत. तर भारताकडून बुमराहने गोलंदाजीला सुरुवात केली आहे.
-
IND vs SCO: भारतीय संघात एक बदल
भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली असून मागील सामन्यातील संघामध्ये फक्त एक बदल केला आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूरला बेंचवर बसवून मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्तीला संघात घेतलं आहे.
-
India vs Scotland Toss result: विराटने जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय
विश्वचषकात एकदाही नाणेफेक न जिंकलेल्या विराटने आज नाणेफेक जिंकली आहे. भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
? Toss Update ?#TeamIndia have elected to bowl against Scotland. #T20WorldCup #INDvSCO
Follow the match ▶️ https://t.co/cAzmUe5OJM pic.twitter.com/ugdOkruzLH
— BCCI (@BCCI) November 5, 2021
-
न्यूझीलंडचा विजय
भारत आणि स्कॉटलंड सामन्यापूर्वी न्यूझीलंड आणि नामिबीया यांच्यात सामना झाला. ज्यात न्यूझीलंडने नामिबीयाला 52 धावांनी मात दिली आहे.
-
IND vs SCO: भारतीय संघ मैदानात
भारतीय संघ आजच्या सामन्यासाठी रणनीती तयार करताना दिसून आला. सरावादरम्यान सर्व खेळाडू रणनीती करत असल्याचा फोटो बीसीसीआयने पोस्ट केला आहे.
Huddle talk ✅
Time to hit the ground running ?#TeamIndia #T20WorldCup #INDvSCO pic.twitter.com/uRhy6dy1TI
— BCCI (@BCCI) November 5, 2021
-
IND vs SCO: आजची खेळपट्टी!
भारत विरुद्ध स्कॉटलंड सामन्यापूर्वी खेळपट्टी कशी आहे याचा फोटो बीसीसीआयने पोस्ट केला आहे.
Hello from Dubai for #TeamIndia‘s clash against Scotland ?
Here’s a look at the pitch! #T20WorldCup #INDvSCO pic.twitter.com/iQyomrmHSI
— BCCI (@BCCI) November 5, 2021
-
IND vs SCO: आजतरी विराट नाणेफेक जिंकणार का?
नाणेफेक आणि विराट यांचा अगदी 36 चा आकडा आहे. यंदाच्या विश्वचषकाततर एकदाही विराट नाणेफेक जिंकलेला नाही. त्यामुळे आजतरी विराटचं नशीब चमकणार का? हे पाहावं लागेल.
-
किरण गोसावीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत वाढ
8 नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश
-
शेखर सावरबांधे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती
नागपूर
काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले शेखर सावरबांधे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती
शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत केला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
त्यांच्या सोबत काही कार्यकर्त्यांनी सुद्धा केला होता प्रवेश
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्वादीला बळ मिळण्याची शक्यता
-
किरण गोसावीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पुणे
किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत वाढ
8 नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश
-
शीळफाटा येथे मोठी जलवाहिनी फुटल्याने नागरिकांच्या घरात घुसले पाणी
ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या शीळफाटा येथे चिंतामणी हॉटेलसमोर एमआयडीसीची मोठी जलवाहिनी फुटल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून नवी मुंबई येथील महापे या ठिकाणी या जलवाहिनी द्वारे पाणीपुरवठा केलं जातं. काही लोक पाण्यामुळे घरात अडकल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे.
-
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यी हल्ला
श्रीनगर
जम्मू काश्मीर – दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर मोठा हल्ला
बेमिना मधील स्कीमस मेडिकल कॉलेजजवळ हल्ला
रुग्णालयातील सुरक्षा दलांवर जोरदार गोळीबार
भारतीय सैन्यदलाकडून सर्च ऑपरेशन सुरू
-
पुण्यातील हॉटस्पॉट गावांच्या संख्येत घट
पुणे
– जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला दिलासा देणारी बातमी,
– कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या घटली,
– सध्या ग्रामीण भागात केवळ ३४ गावे हॉटस्पॉट आहेत,
– या गावांमध्ये दहापेक्षा अधिक करोनाचे रुग्ण असल्याने ही हॉटस्पॉट गावे म्हणून गणली जात आहेत.
– करोनाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट गावांची संख्या ४६५ पर्यंत पोहोचली होती.
-
कुठे पाहाल सामना?
टीम इंडियाचा टी 20 विश्वचषकातील आजचा स्कॉटलंडविरुद्धचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील. या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता
Published On - Nov 05,2021 4:42 PM