IND vs SA : मोहम्मद शमीचं विकेट्सचं द्विशतक, अश्विन-कपिल देवसह दिग्गज गोलंदाजांना पछाडलं

सेन्च्युरियन येथील सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (INDvsSA) सुरु असलेला पहिला कसोटी सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

IND vs SA : मोहम्मद शमीचं विकेट्सचं द्विशतक, अश्विन-कपिल देवसह दिग्गज गोलंदाजांना पछाडलं
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 3:35 PM

सेन्च्युरियन : येथील सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (INDvsSA) सुरु असलेला पहिला कसोटी सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. या कसोटीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 327 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेला केवळ 197 धावांत गुंडाळले. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने पाच बळी घेतले, तर बुमराह-शार्दुलने प्रत्येकी दोन आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. काल तिसऱ्या दिवसअखेर भारताला 146 धावांची आघाडी मिळाली आहे. (India Vs South Afirca : Mohammed Shami Breaks Ravichandran Ashwin’s Record, completed 200 test Wickets)

गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी चांगला फायदा उचलला. पाच गोलंदाजांसह खेळणाऱ्या भारताने त्याच तोडीची गोलंदाजी केली. शामी, बुमराह, ठाकूर, सिराज या चौघांनी भेदक मारा करुन आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावात गुंडाळला. शामीने आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. शार्दुल आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आफ्रिकेकडून फक्त टेंबा बावुमाने (52) अर्धशतक झळकावले. क्विंटन डि कॉक (34) सोबत बावुमाने केलेली भागीदारी आणि राबाडाने (25) थोडा फार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आफ्रिकेला 197 पर्यंत पोहोचता आले.

मोहम्मद शमीने या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट घेतल्या. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा पार केला आहे. आर अश्विनचा विक्रम मोडीत काढत शमी भारतासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा गोलंदाज ठरला. मोहम्मद शमी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट घेणारा पाचवा जलदगती गोलंदाज ठरला आहे.

सर्वात जलद 200 बळी

मोहम्मद शमीच्या आधी कपिल देव, इशांत शर्मा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी हा पराक्रम केला आहे. मोहम्मद शमी हा भारतासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा गोलंदाज आहे. शमीने 9896 चेंडूत 200 कसोटी बळी घेतले आहेत. त्याने 10,248 चेंडूत विकेट्सचे द्विशतक झळकावणाऱ्या अश्विनचा विक्रम मोडित काढला. याबाबतीत भारताचे इतर सर्व गोलंदाज शमी आणि अश्विनच्या मागे आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्यां ‘पंच’नामा

मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्यांदा एका डावात पाच विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत जवागल श्रीनाथने 3 वेळा एका डावात 5 बळी घेतले आहेत. शमीने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 7 डावात 20 विकेट घेतल्या आहेत.

अर्धा संघ तंबूत

सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद शमीने एडन मार्कराम, कीगन पीटरसन, टेम्बा बावुमा, विआन मुल्डर आणि कागिसो रबाडा यांची विकेट घेतली. शमीच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावांत आटोपला आणि भारताला पहिल्या डावात 130 धावांची आघाडी मिळाली होती.

इतर बातम्या

IND VS SA: ऋषभ पंतची कमाल, धोनीचा विक्रम मोडला

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने एक चूक सुधारली आणि टीम इंडियाचे फलंदाज झाले फेल

IND vs SA: रोहितच्या अनुपस्थितीत, विराट असूनही ‘या’ खेळाडूकडे दिली जाऊ शकते वनडेची कॅप्टनशिप

(India Vs South Afirca : Mohammed Shami Breaks Ravichandran Ashwin’s Record, completed 200 test Wickets)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.