IND vs SA, 1st ODI: टॉस जिंकल्यावर पहिली फलंदाजी की गोलंदाजी? जाणून बोलँड पार्कचा पीच रिपोर्ट

कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव झाल्यामुळे वनडे मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसऱ्याबाजूला कसोटी जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्साहाने भरलेला आहे.

IND vs SA, 1st ODI: टॉस जिंकल्यावर पहिली फलंदाजी की गोलंदाजी? जाणून बोलँड पार्कचा पीच रिपोर्ट
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 1:04 PM

पार्ल – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून (INDvsSA) तीन वनडे सामन्यांची मालिका (One day series) सुरु होत आहे. पार्लच्या बोलँड पार्क स्टेडियमवर (Boland park) दुपारी 2 वाजता सामना सुरु होईल. वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर विराट कोहली प्रथमच एक सामान्य खेळाडू म्हणून ही मॅच खेळणार आहे. त्याचाच जवळचा मित्र केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे, रोहित शर्मा दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे राहुलला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे.

कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव झाल्यामुळे वनडे मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसऱ्याबाजूला कसोटी जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्साहाने भरलेला आहे. वनडेमध्ये टेंबा बावुमाकडे संघाचे नेतृत्व आहे. वर्ल्डकप सुपर लीग पाँईटस टेबलमध्ये वरचे स्थान मिळवण्यासाठी यजमानांना कामगिरी उंचावावी लागेल. सध्या ते दहाव्या स्थानावर आहेत.

बोलँड पार्क पीच रिपोर्ट पार्लमधील बोलँड पार्कची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली धावसंख्या पाहायला मिळू शकते. वेगवान आऊटफिल्ड आणि सीमारेषा छोटी असल्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. कसोटीमधील खेळपट्टया गोलंदाजांना मदत करणाऱ्या होत्या. याउलट वनडेमध्ये पीच फलंदाजीला अनुकूल आहे. वेगवान गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, तर ते फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.

बोलँड पार्क रेकॉर्ड या मैदानावर एकूण सामने – 13 प्रथम फलंदाजी करणारा संघ – 7 वेळा विजयी दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ – 5 वेळी विजयी पहिल्या डावात सरासरी धावसंख्या – 243 दुसऱ्याडावात सरासरी धावसंख्या – 175

India vs south africa 1st odi paarl boland park knwo the pitch Report

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.