IND vs SA, 1st ODI: राहुलवर कॅप्टनशिपचा ‘साइड-इफेक्ट’, वेंकटेश अय्यरला बॉलिंग द्यायला विसरला

तो आमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो सहावा गोलंदाज आहे. सहावा गोलंदाज खूप महत्त्वाचा असतो" काल पहिल्या वनडे सामन्याच्या पूर्वसंध्येला कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) वेंकटेश अय्यरसाठी (Venkatesh Iyer) ही विधाने केली होती.

IND vs SA, 1st ODI: राहुलवर कॅप्टनशिपचा ‘साइड-इफेक्ट', वेंकटेश अय्यरला बॉलिंग द्यायला विसरला
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 7:28 PM

पार्ल: “तो आमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो सहावा गोलंदाज आहे. सहावा गोलंदाज खूप महत्त्वाचा असतो” काल पहिल्या वनडे सामन्याच्या पूर्वसंध्येला कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) वेंकटेश अय्यरसाठी (Venkatesh Iyer) ही विधाने केली होती. पण आज पार्लमध्ये सामना सुरु झाला, तेव्हा राहुलचे शब्द आणि कृतीमध्ये फरक दिसून आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa, 1st ODI) आज पहिल्या वनडेमध्ये राहुलने वेंकटेश अय्यरला एक षटकही दिले नाही. ऑलराऊंडर म्हणून वेंकटेश अय्यरला संघात घेतले होते, मग त्याला एक ओव्हरही का दिली नाही? राहुलच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राहुल असा कसा विसरला? महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियाचे आज प्रमुख पाच गोलंदाज विकेट काढण्यासाठी संघर्ष करत होते, त्यावेळी राहुलला वेंकटेश अय्यर दिसला नाही. वेंकटेश क्षेत्ररक्षण करत होता, पण राहुलने त्याला गोलंदाजी दिली नाही. केएल राहुलच्या याच रणनितीवर गौतम गंभीरने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “वेंकटेश अय्यर गोलंदाजीसाठी सहावा पर्याय होता. ऑलराऊंडर म्हणून तुम्ही त्याला संघात घेतलं, मग त्याला गोलंदाजी दिली पाहिजे होती” असे गौतम गंभीर कॉमेंट्री करताना म्हणाला.

विजय हजारे करंडक स्पर्धेत वेंकटेश अय्यरने दाखवला जलवा वेंकटेश अय्यरने विजय हजारे करंडक स्पर्धेत फक्त बॅटनेच नाही, चेंडूनेही करामत दाखवली होती. त्याने या स्पर्धेत नऊ विकेट घेतल्या होत्या. त्याचा इकॉनमी रेट प्रति षटक 6 धावांपेक्षाही कमी होता. राहुल स्वत:च बोलला वेंकटेश गोलंदाज आहे आणि त्यालाच गोलंदाजी दिली नाही. हे चक्रावून टाकणारं आहे. पहिल्या 20 षटकात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी बॉलिंग केली. मलान आणि डिकॉकला मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. त्यांचे दोन विकेटही लवकर गेले होते. पण कॅप्टन टेंबा बावुमा आणि डुसे जोडीने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी करुन भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. या दोघांच्या शतकाच्या बळावरच दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 296 धावा केल्या.

india vs south africa 1st odi venkatesh iyer didnt get a single over despite 6th bowling option

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.