IND vs SA 1st T20 : कोहलीला OUT करुन नॉर्खिया जास्तच जोशात आलेला, सूर्यकुमारने शिकवला धडा पहा VIDEO
IND vs SA 1st T20 : हवेत गेलेल्या नॉर्खियाला सूर्याने असं जमिनीवर आणलं
मुंबई: टीम इंडियाने आधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका विजय मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या T20 सामन्यात पराभव केला. तीन T20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडे आता 1-0 अशी आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सुरुवात करणं टीम इंडियासाठी अजिबात सोपं नव्हतं. सूर्यकुमार यादवने भारताचं काम सोपं केलं. त्याचवेळी त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाला सुद्धा धडा शिकवला.
सुरुवात खूपच खराब
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 107 धावांच लक्ष्य दिलं होतं. टीम इंडियाने 20 चेंडू आणि 8 विकेट राखून हे टार्गेट पार केलं. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली होती.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन प्रमुख फलंदाज 17 धावातच तंबुत परतले होते. त्यानंतर केएल राहुलने सूर्यकुमार सोबत मिळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. दोघांनी नाबाद अर्धशतकं झळकावली.
नॉर्खियाला सडेतोड प्रत्युत्तर
केएल राहुलने 56 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. सूर्याने आपली स्फोटक फलंदाजी कायम ठेवली. त्याने 33 चेंडूत नाबाद 50 धावा चोपल्या. कोहलील बाद केल्यानंतर नॉर्खिया हाय जोशमध्ये आला होता. सूर्याने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
7 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर नॉर्खियाने कोहलीला आऊट केलं. कोहली 3 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
Hit it like SKY! ?? Enjoy that cracking SIX ? ?
Follow the match ▶️ https://t.co/L93S9k4QqD
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia pic.twitter.com/7RzdetvXVh
— BCCI (@BCCI) September 28, 2022
बॅटनेच बोलती केली बंद
कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव क्रीजवर आला. त्याने नॉर्खियाच्या चेंडूंचा सामना केला. सुरुवातीला नॉर्खियाने सूर्याला चकवलं. पण त्यानंतर सूर्याने या आफ्रिकन गोलंदाजाची बोलती बंद केली. त्याच्या 2 बॉलवर 2 कडक सिक्स ठोकले.
विराट कोहलीच्या विकेटनंतर नॉर्खिया जोशमध्ये आला होता. सलग 2 षटकार खाल्ल्यानंतर त्याचा चेहरा पाहण्यालायक झाला होता.