Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA, 2nd ODI: राहुल-पंत गोंधळले, पण दक्षिण आफ्रिकेच्या फिल्डर्सनी त्या पुढची मोठी चूक केली, पाहा कॉमेडी VIDEO

पार्लमध्ये (Paarl) सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) रनआऊट करण्याची एक सोपी संधी दवडली.

IND vs SA, 2nd ODI: राहुल-पंत गोंधळले, पण दक्षिण आफ्रिकेच्या फिल्डर्सनी त्या पुढची मोठी चूक केली, पाहा कॉमेडी VIDEO
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 5:19 PM

डरबन: पार्लमध्ये (Paarl) सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) रनआऊट करण्याची एक सोपी संधी दवडली. केशव महाराज आणि एंडिले फेहुलकवायो यांच्यात बॉल कलेक्ट करण्यावरुन गोंधळ उडाला. 15 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा प्रकार घडला. राहुल आणि पंत एकाच एंडवर उभे होत, तरीही दक्षिण आफ्रिकेला रनआऊट घेता आलं नाही.

केशव महाराजच्या गोलंदाजीवर पंतने मारलेला फटका मिडविकेटला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे गेला. पंत धाव घेण्यासाठी क्रीझमधून बाहेर निघाल्यानंतर राहुलही दुसऱ्या एंडला पोहोचण्यासाठी निघाला. राहुल खेळपट्टीच्या मध्यापर्यंत पोहोचल्यानंतर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्याने पंत पुन्हा माघारी फिरला. त्यावेळी दोन्ही फलंदाज स्ट्राइक एन्डला होते.

दक्षिण आफ्रिकेला धावबाद करण्याची खूप सोपी संधी होती. कॅप्टन बावुमाने नॉन स्ट्राइक एन्डला थ्रो केलेला चेंडू महाराजला पकडता आला नाही. त्यानंतर मिडऑफला असलेला फेहुलकवायोलाही तो चेंडू पकडून लगेच थ्रो करण्यात अपयशी ठरला. त्याने बॉल अडवला पण ज्या गतीने हे सर्व घडायला पाहिजे होते, ते झालं नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने एक सहज विकेट मिळवण्याची संधी सोडली.

आश्चर्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या फिल्डर्समध्ये कुठलाही ताळमेळ दिसला नाही. चेंडू व्यवस्थित पकडलेला नाहीय, हे राहुल-पंतला माहितच नव्हतं. राहुलने तर विकेट जाणार हे गृहितच धरलं होतं. पण चेंडू कोणाच्या हातातच नाहीय, हे लक्षात आल्यानंतर तो सुरक्षितपणे माघारी परतला. त्यावेळी भारताच्या दोन बाद 70 धावा झाल्या होत्या. याच जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.