IND vs SA 2nd ODI Playing XI: पुण्याच्या ऋतुराजला ड्रॉप करणार का? कशी असेल प्लेइंग 11
IND vs SA 2nd ODI Playing XI: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ODI साठी अशी असेल playing 11
मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज दुसरा वनडे (IND vs SA) सामना होणार आहे. पहिला वनडे सामना लखनौमध्ये (Lucknow) झाला. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 9 धावांनी विजय मिळवला होता. यावेळी रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मॅच होणार आहे. माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) शहरात दुसरा वनडे सामना होणार आहे. आजची मॅच जिंकून सीरीजमध्ये बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा उद्देश असेल.
प्लेइंग -11 मध्ये काही बदल होऊ शकतात
शिखर धवन या सीरीजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. टीम इंडियाला पहिल्या वनडेमध्ये चांगली सुरुवात मिळाली नाही. पण, तरीही टीम लढाऊ बाणा दाखवला होता. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग -11 मध्ये काही बदल होऊ शकतात.
पहिल्या वनडेत कोणी डेब्यु केला?
टीम इंडियाने पहिल्या वनडेमध्ये शुभमन गिल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी दिली होती. ऋतुराज गायकवाडने या मॅचमधून वनडेत डेब्यु केला. त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याने खेळपट्टीवर जास्तवेळ टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.
गिल, गायकवाड, इशानला ड्रॉप करणार?
इशान किशनला टीम इंडियाच्या वनडे आणि टी 20 टीममध्ये खेळण्याचा अनुभव आहे. पण तो सुद्धा छाप पाडण्यात कमी पडला. युवा ओपनर शुभमन गिलही स्वस्तात आऊट झाला. या खेळाडूंच्या जागी दुसऱ्या कोणाला संधी मिळेल का?. सध्या तरी या प्रश्नाच उत्तर नाही आहे. कारण एक मॅचच्या आधारावर खेळाडूंना टीममधून हटवणं ही सध्याच्या टीम मॅनेजमेंटची पद्धत नाही.
रजत पाटीदारला संधी कधी?
दीपक चाहरला दुखापत झालीय. त्याच्याजागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. सोबतच राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार आणि मुकेश कुमार यांना सुद्धा डेब्युसाठी वाट पहावी लागेल.
IND vs SA: दुसऱ्या ODI साठी संभाव्य प्लेइंग 11
शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि रवि बिश्नोई.