IND vs SA: अजिंक्य रहाणेसाठी शेवटचा चान्स? आज करुन दाखवावच लागेल
आज दुसऱ्याडावात कुठला संघ सरस कामगिरी करतो, त्यावर मालिकेचा निकाल अवलंबून आहे. सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहे.
केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) सुरु असलेला मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघाचे पहिले डाव पूर्ण झाले असून भारताला पहिल्या डावात 13 धावांची निसटती आघाडी मिळाली. आज दुसऱ्याडावात कुठला संघ सरस कामगिरी करतो, त्यावर मालिकेचा निकाल अवलंबून आहे. सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहे. सेंच्युरियन (Centurion test) भारताने जिंकले तर, जोहान्सबर्गची कसोटी (Johansburg test) दक्षिण आफ्रिकेने. त्यामुळे केपटाऊन जिंकणारा मालिकेचा विजेता ठरणार आहे.
आव्हान टिकवलं ते केवळ गोलंदाजांमुळे
भारतीय संघ मालिकेत आपले आव्हान टिकवून आहे, ते केवळ गोलंदाजांमुळे. कमी धावसंख्या झाल्यानंतरही भारतीय गोलंदाज प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेला रोखत आहेत. कालच्या दिवसात गोलंदाजांनी आपली भूमिका एकदम चोख बजावली. त्यांच्यामुळेच भारताला अजूनही मालिका जिंकण्याची आणि 29 वर्षात जे घडलं, नाही ते करुन दाखवण्याची संधी आहे. आता सर्वकाही फलंदाजांवर आहे. फलंदाजांनी आज चांगली धावसंख्या उभारली तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ बॅकफूटवर ढकलला जाईल.
भारतीय फलंदाज का अपयशी ठरतायत?
सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावा व्यतिरिक्त भारतीय संघाला संपूर्ण मालिकेत अजून तशी फलंदाजीच करता आलेली नाही. त्याच कसोटीच्या पहिल्या डावात भारताने 300 धावांचा टप्पा पार केला होता. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाज फार काळ तग धरत नाहीयत. एखाद-दुसरा फलंदाज अर्धशतक झळकावतोय. अन्य फक्त हजेरीवीर ठरत आहेत. केपटाऊनच्या पहिल्या डावात कॅप्टन विराट कोहलीच्या झुंजार 79 धावांमुळे भारताला 223 धावसंख्येपर्यंत पोहोचता आले होते.
शतकी भागीदाऱ्या आवश्यक
सामना जिंकायचा असेल, दोन-तीन शतकी भागीदाऱ्या आवश्यक आहेत. आज विराट आणि पूजारा डावाची सुरुवात करतील. विराटने आपण फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. पुजारानेही पहिल्या डावात 43 धावांची चांगली खेळी केली होती. अजिंक्य रहाणेला मात्र अजूनही कामगिरीत सातत्य दाखवता आलेलं नाही. जोहान्सबर्गच्या पहिल्या डावात शुन्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकवून त्याने संघातील स्थान कायम राखलं. पण केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात (9) धावांवर स्वस्तात बाद झाला. आधीच अजिंक्य रहाणेला बाहेर बसवा, अशी मागणी होत आहे. त्याच्या टेस्ट करीयरबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे आज राहणेला अजिंक्य खेळ दाखवावा लागेल. अन्यथा पुढे त्याला संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे.
From Centurion to Cape Town via Jo’Burg ? ?
The tradition continues ? ?#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/lioDrrX2Wq
— BCCI (@BCCI) January 12, 2022
भारत पहिला डाव – 223 दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 210 भारत दुसरा डाव – 2 बाद 57 एकूण आघाडी – 70 धावा
संबंधित बातम्या: Virat Kohli: विराटने स्लीपमध्ये घेतली सुपर्ब कॅच, सुनील गावस्करांनीही केला सलाम, पाहा VIDEO IND vs SA: अंपायरकडून मोठी चूक, शार्दुल ठाकूरने टाकलं सात चेंडूंच षटक IND VS SA: याला म्हणतात कॅप्टन, विराटने शमीमध्ये जोश भरला आणि त्यानंतर पुढच्या तीन चेंडूत मैदानात जे घडलं ते….