IND vs SA: आजच्या तिसऱ्या T 20 मॅचसाठी अशी असू शकते Playing 11, पुण्याच्या मुलाला वगळणार?

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आता मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजच्या तिसऱ्या T 20 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.

IND vs SA: आजच्या तिसऱ्या T 20 मॅचसाठी अशी असू शकते  Playing 11, पुण्याच्या मुलाला वगळणार?
Rahul dravid & Rishabh Pant Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 11:08 AM

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आता मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजच्या तिसऱ्या T 20 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. दिल्ला आणि कटक मध्ये दक्षिण आफ्रिकेने आरामात विजय मिळवला. आता विशाखापट्टनममध्ये टीम इंडिया (Team India) कमबॅक करणार का? हा प्रश्न आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला खेळात सुधारणा आणि काही बदल करण्याची आवश्यकता आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी (Batting & Bowling) दोन्ही आघाड्यांवर भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्य नाहीय. दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम क्रिकेट खेळतोय. पुनरागमनासाठी भारतीय संघाला आपल्या खेळाचा स्तर उंचावावा लागेल. त्यासाठी भारतीय संघाला प्लेइंग 11 मध्ये काही बदल करावे लागतील.

दोन OUT, दोन IN

टीम इंडियात बदल निश्चित मानला जात आहे. ऋतुराज गायकवाड दोन सामन्यात प्रभाव पाडू शकलेला नाही. अक्षर पटेललाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या दोघांना बाहेर बसवलं जाऊ शकतं. आता प्रश्न हा आहे की, या दोघांना बाहेर बसवायचं, मग संधी कोणाला मिळणार?. अक्षर पटेलच्या जागी वेंकटेश अय्यरला संधी मिळू शकते. कारण फलंदाजी बरोबर तो गोलंदाजी करण्यासही सक्षम आहे. टीम इंडिया गोलंदाजी बळकट करण्यासाठी उमरान मलिकलाही संधी देऊ शकते. ओपनिंगला ऋतुराज गायकवाडच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळू शकते. तो सुद्धा गोलंदाजीचा एक चांगला पर्याय आहे.

तिसऱ्या टी 20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11

ऋषभ पंत (कॅप्टन), इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, वेंकटेश अय्यर/उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि युजवेंद्र चहल,

हे सुद्धा वाचा

कामगिरी उंचावावी लागेल

विशाखापट्टनम मध्ये जिंकण्यासाठी टीम इंडियाला दमदार खेळ दाखवावा लागेल. त्याशिवाय रणनितीमध्येही बदल करावा लागेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ फिरकी गोलंदाजी चांगल्या प्रकारे खेळत आहे. अशावेळी मध्यमगती गोलंदाजीची ताकत वाढवायची गरज आहे. भारतीय फलंदाजांनाही आपली कामगिरी उंचावावी लागेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.