केपटाऊन: जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) जगातला सर्वोत्तम गोलंदाज का आहे? ते त्याने आज केपटाऊनच्या मैदानावर दाखवून दिलं. केपटाऊन कसोटीच्या (Capetown test) आजच्या दुसऱ्यादिवसाची दमदार सुरुवात झाली. एडेन मार्कराम (Markram) आणि केशव महाराजने आज धावसंख्येत एकाही धावेची भर घालण्याआधीच दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीचा करिष्मा दाखवला. बुमरहाने आठ धावांवर खेळणाऱ्या मार्करामच्या यष्टया वाकवल्या. भारताने कसोटी सामना जिंकण्यासाठी जसप्रीत बुमराहचं चालण आवश्यक आहे. परदेशात भारताने ज्या कसोटी मालिका जिंकल्यात त्यात बुमराहचं महत्त्वाचं योगदान आहे.
सर्वच जण अवाक झाले
बुमराहने याच मैदानावर चार वर्षांपूर्वी आपल्या कसोटी करीयरला सुरुवात केली होती. सध्या सुरु असलेल्या मालिकेत बुमराहला अजून आपला जलवा दाखवता आलेला नाही. पण आज बुमराहने जे केलं, ते पाहून मैदानावरील सर्वच जण अवाक झाले. बुमराहने त्याच्या गोलंदाजीच विशेष कौशल्य दाखवलं व मार्करामला क्लीन बोल्ड केलं. बुमराहने टाकलेला चेंडू इतका जबरदस्त होता की, मार्करामला तो कळलाच नाही.
Bumrah removes Aiden markram on 2nd ball of day 2 #INDvSA pic.twitter.com/geu49iQQqp
— WORLD TEST CHAMPIONSHIP NEWS (@RISHItweets123) January 12, 2022
समोर मार्कराम होता
केपटाऊनच्या न्यूलँडस स्टेडियमवर बुमराह आपलं पहिलं षटक टाकत होता. समोर मार्कराम होता. बुमराहने पहिला चेंडू समोरुन बाहेर काढला. पण पुढच्या चेंडूवर जे घडलं, त्याने सर्वचजण अवाक झाले. बुमराहने पहिला चेंडू ज्या टप्प्यावर टाकला, दुसरा चेंडूही तसाच टाकला. मार्करामला वाटलं तो चेंडू बाहेर जाईल म्हणून त्याने तो सोडला. पण घडलं उलटच. बुमराहचा तो चेंडू थेट आता आला आणि मार्करामच्या ऑफस्टम्पचा वेध घेतला. आपण बोल्ड झालोय यावर मार्करामच विश्वासच बसला नाही.