Virat Kohli: दोन चुकांमध्ये किती अंतर पाहिजे, करीयर कसं पुढे जातं? विराटने सांगितली धोनीची शिकवण

विराट कोहलीला ऋषभ पंतच्या शॉट सिलेक्शनबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना त्याने करीयरच्या सुरुवातीला एमएस धोनीकडून मिळालेल्या शिकवणीचे स्मरण केले.

Virat Kohli: दोन चुकांमध्ये किती अंतर पाहिजे, करीयर कसं पुढे जातं? विराटने सांगितली धोनीची शिकवण
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 4:36 PM

जोहान्सबर्ग: मागच्या काही काळापासून भारताची मधलीफळी अपेक्षित कामगिरी करत नाहीय. विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची बॅट तळपलेली नाही. या तिघांबरोबरच ऋषभ पंतही विशेष चमकदार कामगिरी करु शकलेला नाही. त्याचा खराब फॉर्मशी सामना सुरु आहे. ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेत चारही डावात फ्लॉप ठरला आहे. पंत फ्लॉप तर आहेच, पण त्याचवेळी बेजबाबदार फटकेही खेळतोय. त्यामुळे पंत अनेक क्रिकेट पंडितांच्या निशाण्यावर आहे. (india vs south africa 3rd test virat kohli big comment on rishabh pant mistake ms dhoni capetown)

चुकांमधून शिकणं खूप महत्त्वाचं

स्वत: विराट कोहलीने आज ऋषभ पंतबद्दल विधान केले. “ऋषभ पंतसोबत टीम मॅनेजमेंटने चर्चा केली आहे. सरावादरम्यान त्याच्याशी चर्चा केली आहे. चुका सगळ्यांकडून होतात. पण त्या चुकांमधून शिकणं खूप महत्त्वाचं असतं. कधी कुठला फटका खेळायचा ते समजणं महत्त्वाचं आहे. ऋषभलाही ही गोष्ट समजते” असे विराट म्हणाला. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावात ऋषभ बेजबाबदार फटका खेळून बाद झाला. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका सुरु आहे.

ऋषभ पंतच्या शॉट सिलेक्शनबद्दल प्रश्न विचारला

विराट कोहलीला ऋषभ पंतच्या शॉट सिलेक्शनबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना त्याने करीयरच्या सुरुवातीला एमएस धोनीकडून मिळालेल्या शिकवणीचे स्मरण केले. “दोन चुकांमध्ये कमीत कमी सहा ते सात महिन्यांचं अंतर असलं पाहिजे. तरच करीयर पुढे जातं” हे धोनीने आपल्याला सांगितल्याचं विराट म्हणाला.

“मी ही गोष्ट समजून घेतली व त्या पद्धतीने स्वत:ला तयार करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनीच आपल्या करीयरमध्ये चुका केल्या आहेत. ती चूक दबावामध्ये किंवा चुकीचा फटका खेळून केली आहे. पंतने चूक केली पण सुधारणेसाठी तो तयार आहे व लवकरच दमदार पुनरागमन करेल” असे विराट म्हणाला.

संबंधित बातम्या:

IND vs SA 3rd Test Cape Town Weather: केपटाऊनमध्येही पाऊस खलनायक बनणार? जाणून घ्या वेदर रिपोर्ट Rishabh Pant: ‘खेळाडू मोठा असो वा छोटा, चूक ही चूकच असते’, ऋषभ पंतला पुन्हा सुनावलं Virat Kohli: राहुलची कॅप्टनशीप ते पुजारा-रहाणे अनमोल, विराटच्या पत्रकार परिषदेतले दहा महत्त्वाचे मुद्दे

(india vs south africa 3rd test virat kohli big comment on rishabh pant mistake ms dhoni capetown)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.