IND vs SA: VIDEO: जिंकल्यानंतर टीम इंडियासोबत आफ्रिकन्सही हॉटेलमध्ये जोरदार नाचले

"सामन्यानंतर फोटो पोस्ट करण्याची पंरपरा खूप कंटाळवाणी झाली आहे. त्यामुळे चेतेश्वर पुजाराने डान्स करुन हा क्षण संस्मरणीय बनवायचं ठरवलं आहे"

IND vs SA: VIDEO: जिंकल्यानंतर टीम इंडियासोबत आफ्रिकन्सही हॉटेलमध्ये जोरदार नाचले
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 9:47 PM

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनमधील कसोटी विजयासह भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची शानदार सुरुवात झाली आहे. 29 वर्षानंतर मालिका विजय मिळवण्याच्या इराद्याने दाखल झालेल्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव करुन दणदणीत विजयाची नोंद केली. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत. (India vs South Africa After Centurion Test win R Ashwin post on his social media Celebration dance video in hotel)

हॉटेलमध्ये सेलिब्रेशन सेंच्युरियनमधील ऐतिहासिक विजयाने भारतीय खेळाडूंमध्ये नवीन उत्साह आणि जोश संचारला आहे. परदेश दौऱ्यात भारतीय संघ जिंकल्यानंतर हॉटेलमध्ये नेहमीच सेलिब्रेशन दिसून येते. दक्षिण आफ्रिका दौराही अपवाद नाहीय. विजयानंतर हॉटेलमध्ये आगमन केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी डान्सकरुन विजय साजरा केला.

पावलं गाण्याच्या तालावर थिरकली सेंच्युरियनमध्ये जिंकून संघ हॉटेलमध्ये पोहोचला, त्यावेळी हॉटेलमधील स्टाफने गाणी वाजवून डान्स करुन संघाचे स्वागत केले. शांत स्वभावाचा चेतेश्वर पुजारा, ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजची पावलं गाण्याच्या तालावर थिरकली. अश्विन आणि सिराजने डान्स सुरु केला. त्यांनी पुजारालाही नाचायला भाग पाडले. अश्विनने या डान्स सेलिब्रेशनचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केला आहे.

अश्विन, सिराज सोबत नाचला पुजारा भारतीय खेळाडूंनी नेहमीप्रमाणे सोशल मीडिया अकाऊंटवर विजयाचा आनंद व्यक्त करताना काही फोटो पोस्ट करतात व मनातील काही गोष्टी लिहितात. पण दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने विजयाचं सेलिब्रेशन डान्सने केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. “सामन्यानंतर फोटो पोस्ट करण्याची पंरपरा खूप कंटाळवाणी झाली आहे. त्यामुळे चेतेश्वर पुजाराने डान्स करुन हा क्षण संस्मरणीय बनवायचं ठरवलं आहे. सोबत मोहम्मद सिराज आणि तुमचा अश्विनही आहे” असे अश्विनने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ashwin (@rashwin99)

सध्या आऊट ऑफ फॉर्म असलेल्या पुजारासाठी पहिला कसोटी सामना विशेष ठरलेला नाही. कारण त्याने फक्त 16 धावा केल्या. पहिल्या डावात तर त्याला भोपळाही फोडता आला नाही.

संबंधित बातम्या:

IND VS SA: सचिनला तेंडुलकरला फोन फिरवं, गावस्करांचा विराट कोहलीला प्रेमाचा सल्ला U-19 Asia Cup 2021: टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेला भिडणार IND VS SA: नेटमध्ये ते आम्हाला सहकारी समजत नाहीत, सामन्यानंतर केएल राहुलचं वक्तव्य

(India vs South Africa After Centurion Test win R Ashwin post on his social media Celebration dance video in hotel)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.