रोहित शर्मामुळे ODI टीमचं सिलेक्शन पुढे ढकललं, 4 वर्षांनंतर दिग्गज खेळाडूचं पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला त्यांच्याविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिकाही खेळायची आहे. या मालिकेसाठी सोमवारपर्यंत टीम इंडियाची घोषणा होणार होती पण आता ती 3-4 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

रोहित शर्मामुळे ODI टीमचं सिलेक्शन पुढे ढकललं, 4 वर्षांनंतर दिग्गज खेळाडूचं पुनरागमन
Rohit Sharma
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 10:46 AM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला त्यांच्याविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिकाही खेळायची आहे. या मालिकेसाठी सोमवारपर्यंत टीम इंडियाची घोषणा होणार होती पण आता ती 3-4 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, हा निर्णय वनडेचा नवा कर्णधार रोहित शर्मामुळे घेण्यात आला आहे. खरंतर, रोहित शर्मा अद्याप पूर्णपणे फिट नाही आणि तो या मालिकेत खेळू शकेल की नाही याबद्दलचं चित्र स्पष्ट नाही. यामुळेच बीसीसीआयने निवड समितीची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (India vs South Africa : BCCI delays ODI team selection due to Rohit Sharma’s Injury R ashwin can make comeback)

रोहित शर्माला दुखापत (हॅमस्ट्रिंग इंजरी) झाली असून तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त दिसत आहे पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बीसीसीआयला त्याच्या दुखापतीबद्दल पूर्ण आश्वस्त व्हायचे आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत खेळणार की नाही हे 30 किंवा 31 डिसेंबरपर्यंत ठरवता येणार आहे. रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेसाठी अयोग्य आढळल्यास केएल राहुल संघाची कमान सांभाळू शकतो.

अश्विन वनडे संघात पुनरागमन करणार?

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “संघ निवड पहिल्या कसोटीनंतर केली जाईल. ही बैठक 30 किंवा 31 डिसेंबरला होऊ शकते. रोहित शर्मा फिटनेसवर काम करत आहे पण हॅमस्ट्रिंगची दुखापत ही इतर दुखापतींपेक्षा वेगळी आहे, ती बरी व्हायला थोडा वेळ लागतो.” अश्विनने शेवटचा वनडे सामना 2017 मध्ये खेळला होता. अलीकडेच त्याने टी-20 क्रिकेटमध्येही पुनरागमन केले.

ऋतुराज गायकवाडला संधी?

अश्विनशिवाय ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर या युवा खेळाडूंनाही वनडे संघात संधी मिळू शकते. विजय हजारे ट्रॉफीमध्ये दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती, त्यानंतर त्यांना वनडे संघात स्थान मिळेल असे बोलले जात आहे. निवड समितीच्या बैठकीत मधल्या फळीतील फलंदाज शाहरुख खानच्या नावावरही चर्चा होऊ शकते, असे वृत्त आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये शाहरुख खानने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर तामिळनाडूला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.

इतर बातम्या

Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग, कोलकातामधील रुग्णालयात दाखल, सूत्रांची माहिती

Pro Kabaddi League PKL 2021-22: यू मुंबाच्या अजित कुमारचा जबरदस्त खेळ पण सामना ‘टाय’

SA vs IND, 1st Test: टीम इंडियाच्या लंच मेन्यूमध्ये चिकन चेट्टीनाद, लँब चॉप्स

(India vs South Africa : BCCI delays ODI team selection due to Rohit Sharma’s Injury R ashwin can make comeback)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.