Rishabh Pant: ‘या मुलाला Free सोडा ते सुपरमॅन’, ऋषभला भारतीय खेळाडुंनी आपल्या स्टाइलमध्ये केला सलाम
ऋषभने केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर शानदार शतक झळकावल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी एकापेक्षा एक सरस टि्वट करुन ऋषभचं कौतुक केलं.
केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत (Capetown test) आज ऋषभ पंतने (Rishabh pant) धमाकेदार शतक झळकावलं. अत्यंत कठीण परिस्थितीत ऋषभने झळकावलेल्या या शतकाचं मोल खूप मोठं आहे. कारण मालिकेचा निकाल लावणाऱ्या निर्णायक कसोटीत ऋषभ पंतने ही खेळी केली. एकाबाजूला संघाची पडझड़ सुरु असताना ऋषभ एखाद्या पहाडासारखा विकेटवर टिकून राहिला व शानदार शतक झळकावलं.
या शतकाआधी ऋषभने बरचं काही ऐकलय. त्यामुळे या शतकाचं मोल विशेष आहे. ऋषभने केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर शानदार शतक झळकावल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी एकापेक्षा एक सरस टि्वट करुन ऋषभचं कौतुक केलं.
Is ladke ko free hi chhod do. One of the biggest match winners in Test Cricket round the world #RishabhPant
— Virender Sehwag (@virendersehwag) January 13, 2022
Full of heart and courage! What an innings @RishabhPant17 ? Well done my bro ? pic.twitter.com/nFNz3mVYx2
— Shikhar Dhawan (@SDhawan25) January 13, 2022
Terrific century by Box office @RishabhPant17. Proving his calibre again & again in overseas conditions. Answered to all the critics. Gave something to the bowlers to play with. Credits to Captain & coach for backing this talent.#SAvsIND#SAvIND#TeamIndia#RishabhPant #Pant pic.twitter.com/IKFwiYHBnA
— VenuGopala Rao (@IMVenuGopalRao) January 13, 2022
“हे अविश्वसनीय शतक आहे. त्याने एकहाती भारताला सामन्यात ठेवलं. फक्त X फॅक्टरच नाही, तर ऋषभ कसोटी क्रिकेटमधील भारताचा मोठा मॅच विनर आहे. या मुलाला फ्रि सोडा” असं सेहवागने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Order a Cape at Cape Town for the Superman @RishabhPant17.
What a heroic innings he’s playing!#SAvIND #DKommBox pic.twitter.com/GIMi8LNgdU
— DK (@DineshKarthik) January 13, 2022
He has scored Test tons in Australia and England before and this one in Cape Town is right up there with one of the best counter- attacking innings one would ever see. Has kept India in the game. Take a bow, #RishabhPant . pic.twitter.com/Rfo8C3ZBgS
— VVS Laxman (@VVSLaxman281) January 13, 2022
“परदेशातील वातावरणात ऋषभने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. सर्व टीकाकारांना उत्तर दिलं आहे. या टॅलेंटेड खेळाडूच्या पाठिशी उभ राहण्याचं सर्व श्रेय कर्णधार आणि कोचला जातं” असं वेणूगोपाल रावने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.