IND VS SA: ऋषभ पंतची कमाल, धोनीचा विक्रम मोडला
ऋषभने अवघ्या 26 कसोटी सामन्यात हा टप्पा गाठला. पंतने 2018 साली इंग्लंड विरुद्ध टेस्ट डेब्यु केला होता.
सेंच्युरियन: भारताचा आक्रमक डावखुरा फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) यष्टीपाठी 100 बळी पूर्ण केले आहेत. यष्टीपाठी पंतने आज तीन झेल घेत महेंद्रसिंह धोनीचा (Ms Dhoni) विक्रम मोडला. ऋषभ पंत अत्यंत कमी सामन्यात अशी कामगिरी करणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. ऋषभने अवघ्या 26 कसोटी सामन्यात हा टप्पा गाठला.
तेच धोनीला यष्टीपाठी 100 बळीपर्यंत पोहोचण्यासाठी 36 सामने लागले होते. पंतने 2018 साली इंग्लंड विरुद्ध टेस्ट डेब्यु केला होता. त्याने आतापर्यंत 92 झेल घेतले असून आठ स्टम्पिंग केले आहेत.
सर्वात कमी सामन्यात यष्टीपाठी 100 बळींचा विक्रम ऑस्ट्रेलियन विकेटकिपर गिलख्रिस्ट आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डि कॉकच्या नावावर आहे. दोघांनी फक्त 22 कसोटी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला होता.