‘अजिंक्य सारखेच विराटचे आकडे, मग टीममधील त्याच्या स्थानाबद्दल कोणीच का बोलत नाही’

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचे टेस्ट करीअर संपण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दोन्ही अनुभवी फलंदाजांची धावांची सरासरी 2019 पासून 30 च्या आत आहे.

'अजिंक्य सारखेच विराटचे आकडे, मग टीममधील त्याच्या स्थानाबद्दल कोणीच का बोलत नाही'
Virat Kohli - Ajinkya Rahane
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 3:48 PM

नवी दिल्ली: सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची मधली फळी चिंतेचा विषय बनली आहे. अजिंक्य रहाणे  (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराचे (Cheteshwar pujara) टेस्ट करीअर संपण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दोन्ही अनुभवी फलंदाजांची धावांची सरासरी 2019 पासून 30 च्या आत आहे. काल पुजारा तीन धावांवार बाद झाला. पाठोपाठ रहाणे गोल्डन डक म्हणजे शुन्यावर बाद होऊन तंबूत परतला. (India vs South Africa Even Virat Kohli has similar numbers but people are not questioning his place in the team Ashish Nehra)

कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक (50) आणि अश्विनच्या (46) धावांच्या बळावर भारत कसाबसा 202 धावांपर्यंत पोहोचला. पूजारा आणि रहाणे पाठोपाठ बाद झाल्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. कारण त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. क्रिकेटचे जाणकार रहाणे आणि पुजाराच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून त्यांना संघातून काढून टाकण्याचा सूर लावला जात आहे.

धावसंख्येचे आकडे खूप वाईट नाहीत

माजी क्रिकेटपटू आशिष नेहराने रहाणे आणि पुजारा दोघांना पाठिंबा दिला आहे. “विराट कोहलीच्या आकड्यांशी तुलना केली, तर त्यांच्या धावसंख्येचे आकडे खूप वाईट नाहीत” असे आशिष नेहराने म्हटले आहे. “अजिंक्य आणि चेतेश्वरचे धावांचे जे आकडे आहेत, विराट कोहलीचे आकडे सुद्धा तसेच आहेत. पण संघातील त्याच्या स्थानाबद्दल कोणी बोलत नाही. सहाजिक कोहली कर्णधार आहे आणि त्याने या दोघांपेक्षा खूप वेगळी कामगिरी केली आहे. अशी तुलना करणं योग्य नाही” असं नेहरा म्हणाला.

याची किंमत चुकवावी लागू शकते

“एक मोठी सीरीज सुरु असताना मध्यावर खेळाडूंना वगळणं, संघामध्ये बदल करणं, याची किंमत चुकवावी लागू शकते” असं नेहरा म्हणाला. “अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूला तुम्ही पहिल्या कसोटीत साथ दिली असेल, तर उर्वरित मालिकेत त्याला खेळवणं चांगल राहिलं” असा सल्ला नेहराने दिला.

संबंधित बातम्या: 

VIDEO: उत्तर प्रदेशात ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी, किंचाळ्या आणि गोंधळ; सुदैवाने मोठी हानी टळली कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्या विजयानं अजित पवारांना ‘वाईट’ वाटलं?; भाजपनं पुणे बँक निवडणुकीत खातं कसं उघडलं? भगव्याला दैवत मानलं, भगव्यालाच कवटाळून गळफास, उस्मनाबादेत कट्टर शिवनसैनिकाची आत्महत्या! काय घडलं??

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.