Ajinkya Rahane| करीअर संकटात सापडल्यानंतर रहाणे आणि पुजाराची बॅट तळपली

मागच्यावर्षी इंग्लंड विरुद्ध लॉडर्सवर दोघांनी शतकी भागीदारी केली होती. त्यावेळी भारत जिंकला होता. योगायोग म्हणजे लॉडर्स कसोटीतही भारतीय संघ पहिल्या डावात इंग्लंडपेक्षा 27 धावांनी पिछाडीवर होता.

Ajinkya Rahane| करीअर संकटात सापडल्यानंतर रहाणे आणि पुजाराची बॅट तळपली
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 8:29 PM

जोहान्सबर्ग: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya rahane) आणि चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar pujara) आज ‘करो या मरो’ची स्थिती होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात झाल्यापासून दोघांच्या फॉर्मबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. आतापर्यंत अनेकदा संधी देऊनही अपेक्षित कामगिरी होत नसल्याने त्यांना संघातून हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. जोहान्सबर्ग कसोटीचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवसाचा खेळ भारतासाठी महत्त्वाचा आहे. कालच्या दोन बाद 85 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर दोघांनी शानदार अर्धशतक झळकावली. (india vs south africa Johannesburg Wanderers Stadium cheteshwar pujara ajinkya rahane half century)

मोक्याच्या क्षणी दोघांनी 111 धावांची भागीदारी काल खेळपट्टीवर आल्यापासून दोघांच्या फलंदाजीत आत्मविश्वास दिसत होता. तो आजही कायम होता. रहाणेने (58) तर पुजाराने (53) धावांची खेळी केली. दोन कसोटीच्या चार डावात दोघांनी फलंदाजी केली. चौथ्या डावात त्यांनी थोडाफार लौकीकाला साजेसा खेळ केला. त्यांनी झळकावलेले अर्धशतक संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले, तर त्यांना पुढे संधी मिळू शकते. आताच काही सांगता येणार नाही. पण मोक्याच्या क्षणी दोघांनी 111 धावांची भागीदारी केली.

संघाला शतकी खेळीची अपेक्षा होती सकारात्मक फलंदाजी करताना दोघांनी वेगाने धावा जमवल्या. 61 चेंडूत पहिली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पुजाराने 62 चेंडूत अर्धशतक झळकावले, तर रहाणे 67 चेंडूत 50 धावा केल्या. खरंतर दोघांकडूनही आज संघाला शतकी खेळीची अपेक्षा होती. कारण हे दोघे बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा भारताचा डाव गडगडला आहे.

दोघांच्या शतकी भागीदारीनंतर भारत जिंकतो या दोघांच्या शतकी भागीदाराची एक चांगला रेकॉर्ड आहे. या दोघांनी टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यत सहा शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. सहाही वेळा भारताचा विजय झाला आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा असचं घडो, अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल. आशियाच्या बाहेर दोघांनी दुसऱ्यांदा शतकी भागीदारी केली आहे. मागच्यावर्षी इंग्लंड विरुद्ध लॉडर्सवर दोघांनी शतकी भागीदारी केली होती. त्यावेळी भारत जिंकला होता. योगायोग म्हणजे लॉडर्स कसोटीतही भारतीय संघ पहिल्या डावात इंग्लंडपेक्षा 27 धावांनी पिछाडीवर होता. जोहान्सबर्ग कसोटीतही आता अशीच स्थिती आहे.

संबंधित बातम्या: 

Sourav ganguly: सौरव गांगुलीनंतर आता त्याची मुलगी सनाही कोरोना पॉझिटिव्ह IPL 2022: ‘नाम के हकदार पेहेले आप’, आयपीएलमध्ये लखनऊ संघाच्या बाबतीत पहिल्यांदाच असं घडणार AUSvsENG : स्टुअर्ट ब्रॉडचा भरमैदानात गंगनम स्टाईल डान्स, व्हिडीओ पाहिलात का?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.