कोलकाता | आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील 37 व्या सामन्यात टॉप 2 टीम आज 5 नोव्हेंबर रोजी आमनेसामेन आहेत. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकमेकांशी दोन हात करत आहेत. दोन्ही संघांनी वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. त्यामुळे दोन्ही संघ निश्चिंत आहेत. मात्र या दोन्ही संघांमध्ये आता पॉइंट्स टेबलमधील नंबर 1 साठी रंगतदार सामना होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. तर दक्षिण आफ्रिका टीमनेही फक्त 1 सामना गमावलाय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पैसा वसूल मॅच पाहायला मिळणार आहे.
मुंबईतील मागाठाणे येथे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिवाळी पहाट (मेघ मल्हार) आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे हा पुतळा बसवण्यात येणार आहे.
सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्यक्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक नाट्य, चित्रपट कलावंत प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आला. रंगभूमीदिनाचे औचित्य साधून हा भावे गौरव पदक प्रदान सोहळा विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. गौरवपदक, रोख रक्कम रु. २५,००० हजार, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे गौरव पदकाचे स्वरूप आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदकाने गौरविण्यात आले.
कोलकाता | रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकावर विजय मिळवलाय. टीम इंडियाचा हा या 13 व्या वनडे वर्ल्ड कपमधील सलग 8 वा विजय ठरला आहे. जडेजा आणि कोहली या जोडीने भारताच्या विजयात सर्वाधिक योगदान दिलं.
कोलकाता | दक्षिण आफ्रिकाने सातवी विकेट गमावली आहे. जडेजाने केशव महाराज याला क्लिन बोल्ड केलंय. महाराजने 7 धावा केल्या.
कोलकाता | दक्षिण आफ्रिकाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. मोहम्मद शमी याने रॅसी व्हॅन डर ड्युसेन याला एलबीडब्ल्यू करत आफ्रिकाला पाचवा झटका दिलाय.
कोलकाता | रविंद्र जडेजा याने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का देत दुसरी विकेट घेतली आहे. जडेजाने हेनरिक क्लासेन याला एलबीडबल्यू आऊट केलंय. त्यामुळे आफ्रिकेचा स्कोअर 4 बाद 40 असा झाला आहे.
कोलकाता | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिलाय. क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा आणि एडन मारक्रम आऊट झालाय. मोहम्मद शमी याने मारक्रमला विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं.
कोलकाता | मोहम्मद सिराज याने 327 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकाला पहिला झटका दिलाय. सिराजने क्विंटन डी कॉक याला क्लिन बोल्ड आऊट केलंय. डी कॉकने 5 धावा करुन माघारी परतला.
कोलकाता | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकासमोर 327 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 326 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक नाबाद 101 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर याने 77 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्मा याने 40 धावा जोडल्या. रविंद्र जडेजा याने नाबाद 29 रन्स केल्या. शुबमनने 23 आणि सूर्यकुमार यादव याने 22 धावांचं योगदान दिलं. तर केएल राहुल 8 धावांवर आऊट झाला. तर दक्षिण आफ्रिकाकडून लुंगी एन्गिडी, मार्को जान्सेन, कगिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी या पाच जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
कोलकाता | विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक ठोकलंय. विराटचं हे वनडे करिअरमधील 49 वं शतक ठरलंय.
कोलकाता | भारताला पाचवा झटका लागला आहे. सूर्यकुमार यादव 22 धावावंर कॅच आऊट झालाय. विकेटकीपर क्विंटन डी कॉक याने सुंदर कॅच घेतला.
कोलकाता | मोठा फटका मारण्याच्या नादात केएल राहुल कॅच आऊट झाला. जान्सेन याने केएलचा अप्रतिम कॅच घेतला. केएलने 8 धावा केल्या.
कोलकाता | टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. श्रेयस अय्यर 77 धावांवर आऊट झाला. श्रेयस श्रीलंकानंतर आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक ठोकण्यात अपयशी ठरला.
कोलकाता | बर्थडे बॉय विराट कोहली याच्यानंतर आता श्रेयस अय्यर यानेही अर्धशतक ठोकलंय. श्रेयसने चौकारासह अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने 64 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने फिफ्टी केली. त्यामुळे आता टीम इंडिया चांगल्या स्थितीत पोहचली आहे. आता विराट आणि श्रेयस या दोघांकडून क्रिकेट चाहत्यांना शतक अपेक्षित आहे.
कोलकाता | विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध आपल्या 35 व्या वाढदिवशी वर्ल्ड कप 2023 मधील पाचवं शतक पूर्ण केलं आहे. विराटने 67 बॉलमध्ये हे अर्धशतक केलंय.
कोलकाता | टीम इंडियाने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट आणि श्रेयस अय्यर खेळत आहेत. तर रोहित शर्मा आणि शुबमन गिल दोघे आऊट झाले आहेत.
कोलकाता | टीम इंडियाने दुसरी विकेट गमावलीय. कॅप्टन रोहित शर्मा याच्यानंतर शुबमन गिल माघारी परतला आहे. शुबमन गिल याने 23 धावा केल्या.
कोलकाता | टीम इंडियाला पहिला झटका लागलाय. चांगल्या सुरुवातीनंतर कॅप्टन रोहित शर्मा 40 धावांवर आऊट झालाय. रोहितनंतर आता बर्थडे बॉय मैदानात आला आहे.
कोलकाता | टीम इंडियाची जोरदार सुरुवात झालीय. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे. टीम इंडियाने पावर प्लेचा पूर्ण फायदा घेत दक्षिण आफ्रिकावर बॅटिंगने अटॅक केलाय.
कोलकाता | टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला सुरुवात झालीय. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. टीम इंडियाकडून बॅटिंगसाठी कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आलीय.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन) क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.
टीममध्ये एक बदल | गेराल्ड कोएत्झी याच्या जागी तरबेझ शम्सी याला संधी
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
कोलकाता | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध टॉस जिंकलाय. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकाने आपल्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल केले आहेत.
कोलकाता | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियासमोर नंबर 1 स्पॉट कायम राखण्याचं आव्हान आहे. तर दक्षिण आफ्रिका टीम इंडियाला पछाडून अव्वल स्थानी विराजमान होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.