India vs South Africa LIVE Score, 3rd Test, DAY 4: दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका 2-1 ने जिंकली
भारताला आतापर्यंत सात वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. मागच्या 29 वर्षात टीम इंडियाला इथे मालिका विजयाचे स्वप्न साकार करता आलेले नाही.
केपटाऊन: मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात अखेर भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. पहिली सेंच्युरियन कसोटी (Centurion test) जिंकल्यामुळे 29 वर्षानंतर मालिका विजयाचे स्वप्न साकार होईल, अशी आशा निर्माण झाली होती. पण जोहान्सबर्ग पाठोपाठ केपटाऊन कसोटीतही (Cape town test) दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात गडी राखून पराभव केला.
दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून पीटरसनने शानदार 82 धावांची खेळी केली. डुसे-बावुमा जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आज दिवसभरात भारतीय गोलंदाजांना फक्त एक विकेट मिळवता आला.
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, जयंत यादव, प्रियांक पांचाल, उमेश यादव, हनुमा विहारी आणि इशांत शर्मा.
दक्षिण अफ्रीका: डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा, कगिसो रबाडा, सरेल इरवी, ब्युरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी निगीडी, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, कीगन पीटरसन, रासी वान डर डुसे , काइल वेरेने, मार्को यानसन, ग्लेनटन स्टुरमैन, प्रेनेलन सुब्रायेन, सिसांडा मगाला, रेयान रिकेल्टन, डुआने ओलिवियर.