IND VS SA: इतका राग बरा नव्हे, सिराजने बावुमाला मैदानावर फेकून मारला बॉल

मैदानावर आक्रमकता दाखवताना त्याला मर्यादा असली पाहिजे. मोहम्मद सिराजने आज सेंच्युरियनच्या सुपस स्पोर्ट पार्कवर नको तेवढी अति आक्रमकता दाखवली.

IND VS SA: इतका राग बरा नव्हे, सिराजने बावुमाला मैदानावर फेकून मारला बॉल
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 5:49 PM

जोहान्सबर्ग: सेंच्युरियन कसोटी जिंकून भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची चांगली सुरुवात केली आहे. पण भारताच्या या विजयी आरंभाला छोटसं गालबोट लागलं. क्रिकेटच्या मैदानावर आज मोहम्मद सिराजने अशोभनीय वर्तन केले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये आक्रमकता भरलेली असते. मोहम्मद सिराजही याला अपवाद नाहीय. गोलंदाजी करताना त्याचा आवेश वेगवान गोलंदाजांना अनुकूल असाच आहे. (India vs South Africa Mohammed Siraj fires the ball back at Temba Bavuma batter goes down in pain)

पण मैदानावर आक्रमकता दाखवताना त्याला मर्यादा असली पाहिजे. मोहम्मद सिराजने आज सेंच्युरियनच्या सुपस स्पोर्ट पार्कवर नको तेवढी अति आक्रमकता दाखवली. सिराज दुसऱ्या डावातील भारताचे 62 वे षटक टाकत होता. समोर दक्षिण आफ्रिकेचा टेंबा बावुमा फलंदाजी करत होता. सिराजने टाकलेला चेंडू बावुमाने खेळून काढला. अनेकदा चेंडू थेट गोलंदाजाच्या हातात गेल्यानंतर ते चेंडू स्टंम्पवर फेकण्याची फलंदाजाला हूल देतात.

आजही तसच झालं. पण सिराजने फॉलो थ्रू मध्ये असताना अशी हूल न देता चेंडू थेट बावुमाच्या दिशेने फेकला. हे सर्व अपघाताने घडलं. पण त्या दरम्यान सिराजने वेगात फेकलेला चेंडू बावुमाला लागला. बावुमा बॉल लागल्यानंतर वेदनेने विव्हाळला. सिराजने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेऊन माफी मागितली. चेंडू इतका जोरात लागला की, मैदानावर फिजिओला बोलवावे लागले. बऱ्याचवेळासाठी खेळ थांबला होता. उपचारानंतर बावुमा खेळण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला. या प्रकारानंतर सोशल मीडियाीवर सिराजला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.