IND vs SA: वनडे सीरीज गमावली, कॅप्टन केएल राहुल आता तरी मुंबई-पुण्याच्या प्रमुख खेळाडूंवर विश्वास दाखवेल?
आज संघात अनेक बदल करुन पाहण्याची कॅप्टन केएल राहुल आणि हेड कोच राहुल द्रविड यांना संधी आहे.
केपटाऊन: आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) केपटाऊनमध्ये तिसरा वनडे (Capetown oneday) सामना होणार आहे. कसोटी पाठोपाठ भारताने वनडे मालिकाही आधीच गमावली आहे. त्यामुळे आजचा सामना फक्त औपचारीकता आहे. हा सामना जिंकून क्लीन स्वीप मिळवण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल, तर प्रतिष्ठा वाचवण्साठी सामना जिंकण्याचं चॅलेंज भारतासमोर असेल. आज संघात अनेक बदल करुन पाहण्याची कॅप्टन केएल राहुल आणि हेड कोच राहुल द्रविड यांना संधी आहे.
राहुल खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो शिखर धवनने दोन्ही वनडेमध्ये चांगली कामगिरी केलीय. त्यामुळे त्याचं संघातील स्थान भक्कम आहे. पण वेंकटेश अय्यर दोन्ही वनडेत प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्याजागी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली पाहिजे. स्वत: राहुल खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ऋतुराजला सलामीला पाठवू शकतो. त्याशिवाय श्रेयस अय्यरही दोन सामन्यात चमकदार कामगिरी करु शकलेला नाही. त्याच्याजागी मुंबईच्या सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करता येऊ शकतो. ऋतुराज आणि सूर्यकुमार या दोघांनी स्थानिक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे.
भुवनेश्वर कुमारला बसवणार? पहिल्या दोन वनडे मध्ये भारताला फक्त सात विकेट मिळवता आल्या आहेत. जसप्रीत बुमराह वगळता अन्य गोलंदाज फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन आपली छाप पाडण्यात अपयशी ठरलेत. दक्षिण आफ्रिकेची फिरकी गोलंदाजी भारतीय फलंदाजांना झेपत नाहीय. पण त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय फिरकी गोलंदाजी अगदी आरामात खेळतायत. भुवनेश्वर ऐवजी दीपक चाहरला आज संघात संधी मिळू शकते. अश्विनच्या जागी जयंत यादवला संधी मिळू शकते. शेवटच्या वनडे मध्ये कर्णधार केएल राहुल आणि हेड कोच राहुल द्रविड यांना हे प्रयोग करुन पाहण्याची संधी आहे.
India vs South Africa one day series will Kl rahul give opportunity today to ruturaj gaikwad & Suryakumar yadav