IND vs SA: एकदम कडक! फुकटचा राग देणाऱ्या जॅनसेनला ऋषभने मैदानातच दाखवून दिली जागा, पाहा VIDEO
भारतीय डावातील हे 50 वे षटक होते. पंतने षटकातील पहिले पाच चेंडू सहज खेळून काढले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर पंतने गोलंदाजाच्या दिशेने डिफेंसिव पंच मारला.
केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) केपटाऊनमध्ये (Capetown test) सुरु असलेला कसोटी सामना रोमांचक स्थितीमध्ये आहे. तिसऱ्यादिवसाच्या खेळात ऋषभ पंतचा (Rishabh pant) अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. आफ्रिकेचा युवा गोलंदाज मार्को जॅनसेनने भारतीय गोलंदाजांना जास्त त्रास दिला. पण भारताकडून युवा फलंदाज ऋषभ पंतने उत्तम दर्जाचा खेळ दाखवला. सामन्यादरम्यान जॅनसेन आणि पंत अनेकदा आमने-सामने आले. याआधी देखील मालिकेत दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानातच हमरी-तुमरी झाली आहे. आज मैदानावर फुकटचा राग देणाऱ्या जॅनसेनला ऋषभने त्याच्या एकाच चेंडूवर दोन फटके खेळून जागा दाखवून दिली.
जॅनसेनने प्रभावी गोलंदाजी केलीय या मालिकेत भारताविरुद्धे डेब्यु करणाऱ्या 21 वर्षाच्या जॅनसेनने प्रत्येक डावात आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. भारताच्या दिग्गज फलंदाजांच्या त्याने विकेट काढल्यात. केएल राहुल, चेतेश्वर पुजाराची विकेट काढणाऱ्या जॅनसेनने विराट कोहलीला सुद्धा अनेकदा अडचणीत आणलं आहे. पण आज पंतसमोर जॅनसनचं फार काही चाललं नाही. पंत आऊट होत नसल्याने मैदानावरच जॅनसेनची अस्वस्थतता दिसून आली.
One for sheer comfort Other one for long life pic.twitter.com/A7fryswAFX
— Sritama Panda (Ross Taylor’s Version) (@cricketpun_duh) January 13, 2022
जॅनसेनला पंतने दिलं उत्तर लंचनंतर दुसऱ्यासत्रात पंतसमोर जॅनसेन गोलंदाजी करत होता. भारतीय डावातील हे 50 वे षटक होते. पंतने षटकातील पहिले पाच चेंडू सहज खेळून काढले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर पंतने गोलंदाजाच्या दिशेने डिफेंसिव पंच मारला. फटका खेळल्यानंतर पंत त्याच डिफेंसिव पोजिशनमध्ये होता. जॅनसेनकडे तो चेंडू गेल्यानंतर त्याने रागात तो चेंडू पंतच्या दिशेने फेकला. पंतने पुन्हा एकदा जोरात थ्रो मध्ये आलेला तो चेंडू बॅटने पंच केला. पंतचा हा अंदाज बघून कॉमेंटटरनाही हसू आवरले नाही. त्यांनी पंतचे कौतुक केले.