Ind vs SA: कॅप्टन निवडणं माझं काम नाही, राहुल द्रविडने स्पष्ट केली भूमिका
"मालिका जिंकण्यासाठी तुम्ही कुठल्या एकाखेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही फक्त विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारावर लक्ष केंद्रीत करु शकत नाही"
सेंचुरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) उद्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. सेंचुरियनमध्ये पहिली कसोटी रंगणार आहे. या सामन्याआधी आज टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul dravid) यांनी मीडियाशी संवाद साधला. “आमचं सर्व लक्ष कसोटी मालिकेवर आहे. इथे खेळणं आणि जिंकणं सोप नाहीय” असे द्रविडने सांगितले.
अजिंक्य रहाणेबद्दल द्रविड म्हणाला….
रहाणेसोबत चर्चा सुरु आहे. अंतिम 11 खेळाडूंबद्दल द्रविड म्हणाला की, कुठल्याही खेळाडूला संघाबाहेर करणं सोपं नसतं. प्रत्येक खेळाडू आपल्या फॉर्मवर लक्ष देत आहे.
सराव सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, त्या बद्दल राहुल द्रविड म्हणाला की, सध्या ज्या पद्धतीचे वातावरण आहे, त्यात सराव सामना खेळायला मिळणं इतकं सोप नव्हतं. पण आम्ही सेंटर विकेट सेशन केलं आहे.
कर्णधारपदाबद्दल विचारले प्रश्न कर्णधारपदाच्या मुद्यावरही राहुल द्रविड यांनी आपली बाजू स्पष्ट केली. राहुल द्रविडला मर्यादीत षटकांच्या कर्णधारपदाच्या विषयावर प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “कर्णधार निवडण हे माझं नाही, तर निवड समितीचं काम आहे. आता या विषयावर चर्चा करण्यासाठी सारखी स्थिती नाही. आमचं सर्व लक्ष कसोटी मालिकेवर आहे”
“मालिका जिंकण्यासाठी तुम्ही कुठल्या एकाखेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही फक्त विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारावर लक्ष केंद्रीत करु शकत नाही. प्रत्येकाची एक भूमिका आहे, त्या दृष्टीने आम्ही पुढे जात आहोत” असे द्रविडने सांगितले. भारत-दक्षिण आफ्रिकेतील पहिला सामना सेंचुरीयनवर होणार आहे.