IND vs SA: फायनल मॅचमध्ये पाऊस बनला ‘विलन’, भारतीय खेळाडू मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी

पाचवा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याच भारताचं स्वप्न अखेर पूर्ण होऊ शकलं नाही. पावसाने भारताच्या मार्गात खोडा घातला. त्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) पाच सामन्यांची टी 20 सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली.

IND vs SA: फायनल मॅचमध्ये पाऊस बनला 'विलन', भारतीय खेळाडू मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी
Ind vs SaImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 10:38 PM

मुंबई: पाचवा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याच भारताचं स्वप्न अखेर पूर्ण होऊ शकलं नाही. पावसाने भारताच्या मार्गात खोडा घातला. त्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) पाच सामन्यांची टी 20 सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली. भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय मिळवण्याच्या ऋषभ पंतच्या (Rishabh pant) स्वप्नावर पावसाने पाणी फिरवलं. भारताला अजून मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजमध्ये मालिका विजय मिळवता आलेला नाही. टेंबा बावुमा दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळत नव्हता. त्याच्याजागी केशव महाराजकडे (Keshav Maharaj) दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व होतं. त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ मैदानात उतरले होते. खेळ सुरु होणार इतक्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर पाऊस सुरु झाला. काही वेळाने पाऊस थांबला. त्यामुळे 50 मिनिट उशिराने सामना सुरु झाला. पावसामुळे खेळ 20 ऐवजी 19 षटकांचा करण्यात आला. इनिंग ब्रेकही 20 ऐवजी 10 मिनिटांचा करण्यात आला होता.

मालिकावीराचा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळाला

मॅच उशिराने सुरु झाली. भारताच्या डावात 3.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा ड्रेसिंग रुममध्ये जावे लागले. दुसऱ्यांदा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 3.3 षटकात दोन बाद 28 धावा झाल्या होत्या. ऋषभ पंत एक रन्सवर होता, तर श्रेयस अय्यरने खात उघडलं नव्हतं. भारताकडून इशान किशन 15 आणि ऋतुराज गायकवाड 10 धावांवर बाद होऊन तंबूत परतला होता. भुवनेश्वर कुमारला मालिकावीराच्या पुररस्काराने सन्मानित करण्यात आलं.

दोन्ही संघांची संधी पावसाने हिरावली

भारताकडे पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्याची संधी होती. दक्षिण आफ्रिकेकडे भारतात टी 20 सीरीजमध्ये हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. पण पावासाने दोन्ही संघांकडून ही संधी हिरावून घेतली. दक्षिण आफ्रिकेने 2015 आणि 2019 मध्ये भारत दौऱ्यावर टी 20 सीरीज जिंकली होती. पण यावेळी सीरीज बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकले, तर भारताने पिछाडीवरुन कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.