India vs South Africa T20 : पहिल्या टी 20 साठी टीम इंडियात कोण IN, कोण OUT?, अशी असू शकते Playing 11
India vs South Africa T20 : भारताने या मालिकेसाठी आपल्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे, तेच दक्षिण आफ्रिकेने आपले एकापेक्षा एक सरस खेळाडू या दौऱ्यासाठी भारतात पाठवले आहेत.
मुंबई: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) पहिला टी 20 सामना गुरुवारी होणार आहे. या मॅचसाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज आहेत. भारताने या मालिकेसाठी आपल्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे, तेच दक्षिण आफ्रिकेने आपले एकापेक्षा एक सरस खेळाडू या दौऱ्यासाठी भारतात पाठवले आहेत. विराट कोहली, (Virat Kohli) रोहित शर्मा, (Rohit Sharma) जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांचा टीममध्ये समावेश केलेला नाही. मात्र तरीही भारतीय संघ मजबूत वाटतोय. IPL 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या मालिकेत संधी दिली आहे. सध्याच्या टीममधूनही प्लेइंग 11 मधून निवडणं सोपं नाहीय. पहिल्या टी 20 सामन्यात भारताची Playing 11 काय असेल हा प्रश्न आहे.
भारताकडून सलामीला कोणाला संधी मिळणार?
भारताच्या Playing – 11 मध्ये उद्या कोण-कोण असेल, हे आत्ताच सांगणं खूप कठीण आहे. कारण प्रत्येक खेळाडूला संधी मिळाली पाहिजे, असं वाटतं. कारण भारतीय संघातही एकापेक्षा एक सरस खेळाडू भरले आहेत. भारताकडून केएल राहुल आणि इशान किशन ही जोडी सलामीला येऊ शकते.
Snapshots from #TeamIndia‘s training session ahead of the 1st T20I against South Africa.#INDvSA @Paytm pic.twitter.com/wA8O1Xr0i7
— BCCI (@BCCI) June 8, 2022
तिसऱ्या, चौथ्या नंबरवर कोण येणार? फिनिशरचा रोल कोणाकडे?
तिसऱ्या नंबरवर श्रेयस अय्यर आणि चौथ्या स्थानावर ऋषभ पंतला संधी मिळू शकते. हार्दिक पंड्याला पाचव्या क्रमांकावर संधी मिळेल. सहाव्या स्थानावर दिनेश कार्तिक फलंदाजीला येऊ शकतो. त्याच्याकडे फिनिशरचा रोल असेल, हे हेड कोच राहुल द्रविड यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. अक्षर पटेलचा ऑलराऊंडर म्हणून संघात समावेश करण्यात येईल. युजवेंद्र चहललाही संधी मिळू शकते.
डेब्युसाठी कोणाला वाट पहावी लागेल?
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान यांच्या खांद्यावर असेल. म्हणजेच संघात स्थान मिळवणाऱ्या उमरान मलिक, अर्शदीप सिंह या दोघांना डेब्यूसाठी वाट पहावी लागेल. रवी बिश्नोई, कुलदीप यादव, वेंकटेश अय्यर आणि दीपक हुड्डा यांनाही वाट पहावी लागू शकते.
भारताची संभाव्य Playing 11
केएल राहुल, (कॅप्टन) इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि आवेश खान,