IND vs SA: BCCI कडून भारत-दक्षिण आफ्रिका T-20 सीरीजची घोषणा, कधी, कुठे होणार सामने? जाणून घ्या….
IND vs SA: सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15 वा हंगाम सुरु आहे. हा सीजन संपल्यानंतर लगेचच जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
मुंबई: सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15 वा हंगाम सुरु आहे. हा सीजन संपल्यानंतर लगेचच जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम भारत दौऱ्यात (South Africa India Tour) पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी या दौऱ्याच्या तारखा आणि सामने कुठे, कधी होणार, त्या कार्यक्रमाची घोषणा केली. आयपीएलचा अजून एक महिना बाकी आहे. 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ (Indian Team) 9 जूनपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात करणार आहे. 9 जूनपासून भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 सीरीजची सुरुवात होणार आहे. 19 जूनला सीरीजचा शेवटचा सामना खेळला जाईल.
टी 20 वर्ल्ड कप कधी?
या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. टीम इंडिया तिथे कसोटी आणि वनडे सीरीज खेळली. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सीरीजमध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी टी 20 मालिका होऊ शकली नाही. तीच टी 20 मालिका आता भारतात होणार आहे. आयपीएल नंतर भारतीय संघाची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी भारतीय संघ अनेक टी 20 सामने खेळेल. ज्याची सुरुवात या सीरीजपासून होणार आहे.
NEWS ? – BCCI announces venues for home series against South Africa.
More details ? #INDvSA #TeamIndia https://t.co/suonaC39wR
— BCCI (@BCCI) April 23, 2022
या पाच शहरात होणार सामने
बीसीसीआयने शनिवारी 23 एप्रिलला सीरीजच्या कार्यक्रमाची घोषणा केली. दिल्ली, कटक, विशाखापट्टनम, राजकोट आणि बंगळुरुमध्ये टी 20 चे सामने होणार आहेत. 9 जूनला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममधून या सीरीजची सुरुवात होईल.
IND vs SA T 20 सीरीजचा पूर्ण कार्यक्रम
9 जून पहिला सामना – दिल्ली
12 जून दुसरा सामना – कटक
14 जून तिसरा सामना – विशाखापट्टनम
17 जून चौथा सामना – राजकोट
19 जून पाचवा सामना – बंगळुरु