मुंबई: टीम इंडियाला (Team India) ला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी मोठा धक्का बसला. वनडेचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) वैयक्तिक कारणामुळं वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाल्यानं कसोटी मालिकेत तो खेळू शकणार नाहीय. सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली होती. स्पेशालिस्ट रघूचा चेंडू रोहित शर्माला लागला होता. रोहित शर्मा वनडे मालिकेपूर्वी फिट होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर, रोहित शर्मा फिट झाला नाही तर कॅप्टन कोण असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
विराट कोहलीनं एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. रोहित शर्माला झालेल्या दुखापतीतून तो बरा झाला नाही तर त्याच्या जागेवर कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. के.एल.राहुल, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या पैकी एकाला संधी मिळू शकते.
विराट कोहलीची मुलगी वामिका हिचा पहिला वाढदिवस असल्यानं त्यानं एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे.
रोहित शर्माच्या जागी प्रिंयांक पांचाळची निवड करण्यात आली आहे.
प्रियांक पांचाळ हा भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ सलामीवीर आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 100 मॅचेस खेळल्या आहेत. पांचाळनं 7 हजार धावा केल्या असून त्यानं 24 शतकं केली असून 50 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. देशांतर्गत प्रथमश्रेणी सामन्यामध्ये त्याची नाबाद 314 ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.
इतर बातम्या:
India vs South Africa Virat Kohli withdraw name from odi match Rohit Sharma injured who will new captain