Shardul Thakur: शार्दुल लोकप्रिय, यशस्वी का? ट्रेन करणाऱ्या कोचने सांगितलं त्यामागचं कारण…

सिराज सारख्या प्रमुख गोलंदाजावर मर्याद आलेल्या असताना अष्टपैलू शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) ती जबाबदारी उचलली व सिराजची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घेतली.

Shardul Thakur: शार्दुल लोकप्रिय, यशस्वी का? ट्रेन करणाऱ्या कोचने सांगितलं त्यामागचं कारण...
shardul thakur espn crikinfo
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 8:51 PM

डरबन: जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्यादिवशी भारताला दोन झटके बसले होते. पहिलं म्हणजे पाठिच्या दुखण्यामुळे नियमित कर्णधार विराट कोहलीने माघार घेतली. त्यानंतर दुखापतीमुळे मोहम्मद सिराजने मैदान सोडले. हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याची शक्यता असल्याने सिराज फिजिओसह मैदानाबाहेर गेला. सिराज दुसऱ्यादिवशी मैदानावर आला. पण त्याने फक्त पाच षटक गोलंदाजी केली. सिराज सारख्या प्रमुख गोलंदाजावर मर्याद आलेल्या असताना अष्टपैलू शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) ती जबाबदारी उचलली व सिराजची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घेतली. (India vs South Africa Why shardul thakur successful India bowling consultant Eric Simons answers)

देहबोली आणि जबाबदारी घेण्याची इच्छाशक्ती

जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्यादिवशी कर्णधार डीन एल्गर आणि कीगन पीटरसनची जोडी जमली होती. दोघेही मोठी धावसंख्या उभारु शकतात, असे वाटत होते. दोघांनी मिळून 200 पेक्षा जास्त चेंडू खेळले होते. त्यावेळी शार्दुल ठाकूर संकटमोचक बनून संघासाठी धावून आला. शार्दुलने लंचच्या आधी अवघ्या पाच षटकात खेळाचा नूरच पालटून टाकला. आजचा दिवस शार्दुलने गाजवला. पण हे कशामुळे शक्य झाले, ते एरिक सिमन्स यांनी सांगितले. ते भारताचे माजी गोलंदाजी सल्लागार होते. शार्दुलची देहबोली आणि जबाबदारी घेण्याची इच्छाशक्ती यामुळे शार्दुल आज यशस्वी असल्याचे त्यांनी सांगितले. सुपर स्पोर्टवर लंच ब्रेक शो मध्ये सिमन्स यांनी शार्दुलबद्दल या कमेंट केल्या.

पण त्यामध्ये तो त्वेष दिसला नाही

त्याच्या आत्मविश्वासाबद्दल मी बरच बोललोय पण जबाबदारी घेण्याची त्याची इच्छाशक्ती हा सुद्धा त्याचा एक महत्त्वाचा गुण आहे, असे सिमन्स म्हणाले. “सिराज दुखापतग्रस्त असल्यामुळे आज काय होणार? असा प्रश्न मला पडला होता. आज सिराजने काही षटकं गोलंदाजी केली. पण त्यामध्ये तो त्वेष दिसला नाही. पण आज शार्दुलने जबरदस्त गोलंदाजी केली” असे कौतुक सिमन्स यांनी केले.

शार्दुल संघाचा भाग का आहे?

मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यातही शार्दुलने आपले योगदान दिले होते, याकडे एरिक सिमन्स यांनी लक्ष वेधले. “शार्दुल संघाचा भाग का आहे? तो इतका लोकप्रिय का आहे? बॅटने सुद्धा त्याने तुम्हाला ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये विजय मिळवून दिला आहे. कठीण परिस्थितीत त्याने विकेट मिळवून दिले. पण ते विकेट मिळवण्यासाठी त्याने खरोखर सुंदर गोलंदाजी केली. खेळपट्टी समजून घेतली. संघाला सर्वात जास्त गरज असताना तो जबाबदारी घेतो” अशा शब्दात एरिक सिमन्स यांनी शार्दुलचे कौतुक केले.

संबंधित बातम्या:

Pune Corona : कोरोनामुळे पुणे पुन्हा निर्बंधात! शाळा, कार्यालये, वाहतूक आणि नागरिकांसाठी कोणते नियम, जाणून घ्या एका क्लिकवर Shardul Thakur: तू आहेस तरी कोण? स्टंम्पवरच्या मायक्रोफोनमुळे अश्विनने विचारलेला प्रश्न जगाला कळला Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 18 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 जणांचा मृत्यू

(India vs South Africa Why shardul thakur successful India bowling consultant Eric Simons answers)

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.