India vs South Africa: BCCI विराटची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार? कोहली निर्णय बदलेल?
भारताचे हे दोन्ही प्रमुख खेळाडू महत्त्वांच्या मालिकांमध्ये खेळत नसल्याने वेगळाच अर्थ काढला जात आहे. काही वेळेला फक्त योग्य गोष्टी करणं आवश्यक नसतं, तर योग्य गोष्टी करतोय हे दिसलं पाहिजे.
नवी दिल्ली: नव्या वर्षात जानेवारीमध्ये कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही विराट कोहलीने (Virat kohli) खेळावे, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रयत्नशील आहे. विराटने बीसीसीआयकडे वनडे सीरीजमधून ब्रेक मागितला आहे. आधीच रोहित शर्मा (Rohit sharma) कसोटी मालिकेत खेळणार नाहीय. त्यात विराटने ब्रेक मागितल्याची बातमी समोर आल्याने मीडिया आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.
विराटने ब्रेक कधी मागितला?
विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमधून ब्रेक मागितला हे खरं आहे. पण वनडेच्या कर्णधारपदी रोहितची निवड होण्याआधी विराटने ब्रेक मागितला होता, असं बीसीसीआयमधील सूत्रांच म्हणणं आहे. टीम इंडियामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. सर्वकाही आलबेल आहे हा स्पष्ट संदेश बाहेर गेला पाहिजे, तेच सध्याच्या घडीला बीसीसीआयसमोरचं मुख्य आव्हान आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
योग्य गोष्टी करतोय हे दिसलं पाहिजे
रोहितने दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे, तर विराटला कौटुंबिक कारणांसाठी ब्रेक हवा आहे. भारताचे हे दोन्ही प्रमुख खेळाडू महत्त्वांच्या मालिकांमध्ये खेळत नसल्याने वेगळाच अर्थ काढला जात आहे. काही वेळेला फक्त योग्य गोष्टी करणं आवश्यक नसतं, तर योग्य गोष्टी करतोय हे दिसलं पाहिजे, असं या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्राने सांगितले.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कोहली आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी या विषयावर पडदा पडू शकतो. कोहलीला व्यक्तीगत कारणांसाठी ब्रेक हवा आहे. कर्णधार बदलल्यामुळे तो नाराज आहे, या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहेत, असे बोर्डातील सूत्रांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या: INDvSA: रोहित दुखापतग्रस्त असल्याने सलामीच्या जागेसाठी ‘या’ तिघांमध्ये चुरस ‘आव्हानांचा विचार केला, तर…’, टेस्ट टीममध्ये निवड झाल्यानंतर प्रियांक म्हणाला… Kuldeep Yadav : टीम इंडियाचा चायनामन कुलदीप यादव निघालेला आत्महत्या करायला? नेमकं कारण काय?