IND vs SA, WWC 2022: Semi Final चं भारताचं स्वप्न अधुरंच! शेवटच्या Ball वर दक्षिण आफ्रिकेनं मॅच फिरवली
IND vs SA, WWC 2022: आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या (ICC Women World Cup 2022) एका महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa vs india) भारताला पराभूत केलं.
मुंबई: आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या (ICC Women World Cup 2022) एका महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa vs india) भारताला पराभूत केलं. या पराभवाबरोबरच भारतीय महिला क्रिकेट संघाचं सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न देखील भंग पावलं. दक्षिण आफ्रिकेने भारताला तीन विकेटने हरवलं. ज्याचा फायदा वेस्ट इंडिजच्या महिला संघाला झाला. भारताच्या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा संघ (West Indies) सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं 275 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. क्राइस्टचर्चमध्ये खेळलेल्या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या चेंडूवर विजय साकारला. अशा प्रकारे भारताचं वर्ल्ड कप मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. 275 धावांचा यशस्वी पाठलाग करुन दक्षिण आफ्रिकेने भारताविरोधात नवीन रेकॉर्ड बनवला आहे. भारताविरोधात त्यांनी केलेला धावांचा हा सर्वात मोठा पाठलाग आहे. याआधी त्यांनी भारताविरोधात 267 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला थरार
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्याचा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. दोन चेंडू शिल्लक असताना दीप्तिने डु प्रीजची विकेट काढली. सामना भारत जिंकणार असं वाटलं. पण त्याचवेळी पंचांनी तो नो बॉल ठरवला. दक्षिण आफ्रिकेला अतिरिक्त चेंडू मिळाला. तोच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला.
Update: India’s campaign in the #CWC22 comes to an end. South Africa needed 1 off the final ball and managed to score the winning run.
Details ▶️ https://t.co/BWw8yYwlOS#TeamIndia | #CWC22 | #INDvSA pic.twitter.com/1EoGNKtujO
— BCCI Women (@BCCIWomen) March 27, 2022
भारताची नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार मिताली राजचा हा निर्णय योग्य ठरला. स्पर्धेत पहिल्यांदाच शेफालीची बॅट तळपली. पावरप्लेच्या पहिल्या दहा षटकात भारताची धावसंख्या 68 होती. 12 व्या षटकात शेफालीचा विकेट गेल्यानंतर धावगतीला ब्रेक लागला.
पहिल्या विकेटसाठी शेफाली आणि स्मृतीमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी मिताली आणि स्मृतीने अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी तुटल्यानंतर हरमनप्रीतने मिताली सोबत मिळून 50 धावांची भागीदारी केली. 40 षटकात भारताच्या 223 धावा झाल्या होत्या. पण शेवटच्या 10 षटकात फक्त 51 धावा निघाल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 300 पर्यंत पोहोचू शकली नाही.