पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!

सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची धमाकेदार खेळी करत भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. पहिल्या 5 ओव्हरमध्येच भारताने श्रीलंकेला बॅटफूटवर ढकललं.

पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं 'ते' ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!
वीरेंद्र सेहवाग आणि पृथ्वी शॉ
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 7:47 AM

मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 7 विकेट्सने हरवलं आहे. 7 विकेट्स आणि 80 चेंडू राखून भारताने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयाचा पाया रचला तो सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवनने (Shikhar Dhawan)…! पृथ्वीने तर कहरच केला… त्याने पहिल्या ओव्हरपासून श्रीलंकेच्या बोलर्सचा समाचार घेतला. त्याने केवळ 24 चेंडूत 43 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचं ट्विट आता व्हायरल झालं आहे.

पृथ्वी शॉच्या बॅटिंगमध्ये तेंडुलकर, सेहवाग आणि लाराची झलक

पृथ्वी शॉने अशी काही बॅटिंग केली की, त्याच्यामुळे श्रीलंकेचा संघ पहिल्या 5 षटकांत पूर्णपणे सामन्यातून बाहेर पडला. पृथ्वी शॉच्या बॅटिंगवर वीरेंद्र सेहवागने एक मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वी शॉच्या बॅटिंगमध्ये तेंडुलकर, सेहवाग आणि लाराची झलक दिसून येते, असं म्हणतात…. बऱ्याच वेळी अशी चर्चा होते. सेहवागने हाच धागा पकडला.

सेहवागच्या ट्विटमधून पृथ्वीचं कौतुक तर शास्त्रींची फिरकी

वीरेंद्र सेहवागने स्वत: चा, ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की, ‘पहिल्या 5.3 षटकांतच आमचा जलवा राहिला.’ सेहवाग, सचिन आणि लारा यांची झलक पृथ्वी शॉमध्ये दिसते आहे, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं. या ट्विटमधून सेहवागने पृथ्वीचं कौतुकही केलं आणि शास्त्रींची फिरकीही घेतली.

सलामीवीरांनी दाखवला ‘दम’

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 घावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य 7 गडी आणि 80 चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (86) आणि इशान किशनच्या (59) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले. तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करताना 9 चौकार लगावले. भारताच्या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 31 धावा करत भारताला विजय लक्ष्य साध्य करुन देण्यात स्वतःचं योगदान दिलं.

India vs Sri lanka 1st ODI prithvi Shaw Fastest Score Virendra Sehwag Tweet

हे ही वाचा :

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

IND vs SL : शिखर धवनने मैदानात पाऊल ठेवताच केला मोठा विक्रम, धोनी-कोहलीलाही टाकलं मागे

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात संजूला संधी नाही, ‘या’ कारणामुळे एकदिवसीय संघातील स्थान हुकलं

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.