IND vs SL, 1st T20I, LIVE Streaming: जाणून घ्या कधी, कुठे आणि कशी पाहू शकता भारत विरुद्ध श्रीलंका मॅच
IND Vs SL T20 Watch Live: टीम इंडिया आपल्या नव्या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या 3 टी 20 सामन्याच्या सीरीजने करणार आहे.
मुंबई: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपल्या नव्या वर्षाची सुरुवात करेल. भारत आणि श्रीलंकेमध्ये 3 T20 सामन्यांची सीरीज मंगळवारी सुरु होईल. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्यावर मोठी जबाबदारी असेल. पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची मागची टी 20 सीरीज जिंकली. यावेळी भारतासमोर आशियाई चॅम्पियन श्रीलंकेच आव्हान आहे.
पंड्या कॅप्टन, तर व्हाईस कॅप्टन….
श्रीलंकन टीम लंका प्रीमियर लीग खेळून भारतात येत आहे. लीगमध्ये चांगले प्रदर्शन करणारे खेळाडू या टीममध्ये आहेत. भारताने सीनियर खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंची टीम निवडली आहे. पंड्या कॅप्टन, तर सूर्यकुमार यादव उपकर्णधार आहे.
कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना
भारत आणि श्रीलंकेमध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना कधी खेळला जाणार?
भारत आणि श्रीलंकेमध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना मंगळवारी 3 जानेवारीला खेळला जाईल.
भारत आणि श्रीलंकेमध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना कुठे खेळला जाणार?
भारत आणि श्रीलंकेमध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत आणि श्रीलंकेमध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना किती वाजता सुरु होणार?
भारत आणि श्रीलंकेमध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. टॉस संध्याकाळी 6.30 वाजता उडवला जाईल.
भारत आणि श्रीलंकेमधील टी 20 सीरीजच्या पहिल्या सामन्याच लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?
भारत आणि श्रीलंकेमधील टी 20 सीरीजच्या पहिल्या सामन्याच लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल.
भारत आणि श्रीलंकेमधील टी 20 सीरीजच्या पहिल्या सामन्याच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?
भारत आणि श्रीलंकेमधील टी 20 सीरीजच्या पहिल्या सामन्याच लाइव्ह स्ट्रीमिंग डिजनी हॉटस्टारवर होईल. या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स TV9marathi.com वर वाचू शकता.