India vs Sri Lanka, 1st T20 live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात आजपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी-20 सामना काही वेळातच सुरु होणार आहे.

India vs Sri Lanka, 1st T20 live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारत विरुद्ध श्रीलंका
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 7:20 PM

कोलंबो : भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 च्या फरकाने उत्कृष्ट विजय मिळवला. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताला तिसऱ्या सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला होता. आता या दौऱ्यातील दुसरा टप्पा ज्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे तो आजपासून सुरु होत आहे. भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) एकदिवसीय मालिकेप्रमाणे विजय मिळवून श्रीलंका संघाला (Sri Lanka Cricket Team) पराभूत करण्यासाठी मैदानात उतरेल. तर श्रीलंका एकदिवसीय मालिकेत न करु शकलेली कमाल करुन टी-20 मालिका जिकंण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करेल. काही वेळातच या सामन्याला सुरुवात होणार आहे.

या सामन्यात भारतीय संघ कसा असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. भारताकडे आय़पीएल गाजवलेले अनेक टी-20 स्टार श्रीलंका दौऱ्यात असून त्यांना एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली नसल्याने आता त्यांना संधी मिळेल का? हे पाहावे लागेल. T20 मालिकेसाठी भारतीय संघ मिडल ऑर्डर आणि गोलंदाजीमध्ये बदल करु शकतो. त्यामुळे सलामीसाठी कर्णधार शिखरसह पृथ्वी शॉच येतील. तर मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या यांना पाठवले जाईल. त्यामुळे एकदिवसीय संघातील मनीष पांडे T-20 संघात फिट बसत नसल्याने त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. तसेच सूर्यकुमार आणि इशान यांच्यापैकी एकाची जागा देवदत्त पडीक्कल किंवा ऋतुराज गायकवाड घेण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला संधी देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वरूण चक्रवर्ती स्पिनमध्ये चहलच्या जोडीला असतील.

पहिल्या टी-20 सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहार, वरूण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल

सामना कुठे खेळविला जाणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना रविवार, 25 जुलै रोजी कोलंबोच्या आर. प्रेमादासा मैदानावर खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि श्रीलंका संघ यांच्यातील पहिला टी-20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल.

हे ही वाचा

IND vs SL: श्रीलंकेसोबत आज पहिला T20 सामना, टीम इंडियात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल, पाहा संभाव्य अंतिम 11

IND vs SL : श्रीलंकेने लाज राखली, अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतावर निसटता विजय

श्रीलंकेतून थेट इंग्लंडमध्ये, सूर्यकुमार यादवला निरोप, आणखी दोन खेळाडू इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?

(India vs Sri Lanka 1st T20 Live Streaming when and where to Watch online free in Marathi)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.