India vs Sri Lanka, 2nd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला श्रीलंकेच्य़ा सामना तासांतच सुरु होणार आहे. शिखर धवन पहिल्यांदाच भारताचे कर्णधारपद सांभाळणार असल्याने आज नेमकी तो कशी रणनीती आखतो ते पाहावे लागेल.

India vs Sri Lanka, 2nd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
India vs Sri Lanka ODI Live
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 11:54 AM

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) पहिल्या सामन्यातील दमदार विजयानंतर दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली दुसराही सामना खिशात घालून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा डाव आहे. तर श्रीलंका (Sri Lanka Cricket Team) दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमादासा स्टेडियममध्ये (R Premadas Stadium) हा आजचा सामना खेळवला जाणार आहे.

पहिल्या सामन्यात गोलंदाजी आणि विशेष करुन फलंदाजीमध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी तुफानी फलंदाजी केली. तर कर्णधार शिखर धवनने संयमी नाबाद 86 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाजीत फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी केली. ज्यात कुलदीपने आणि चहलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर कृणाल पांड्याने एक विकेट घेतली. हार्दीक पांड्याने देखील 1 विकेट आपल्या नावे केला. श्रीलंका संघाकडून कर्णधार शनाकाने 39 तर धावा केल्या तर अखेरच्या षटकांत फलंदाजीला आलेल्या करुणारत्ने यानेही तुफान फटकेबाजी करत 43 धावा लगावल्या. गोलंदाजीमध्ये कोणत्याच श्रीलंकन खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही. आता दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करणार हे पाहावं लागेल.

सामना कुठे खेळविला जाणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना मंगळवार, 20 जुलै रोजी कोलंबोच्या आर. प्रेमादासा मैदानावर खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि श्रीलंका संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल.

हे ही वाचा :

IND vs SL : पहिल्या सामन्यात जे नाही घडलं ते दुसऱ्या सामन्यात होणार, श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूचे भारताला आव्हान

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

(India vs Sri Lanka 2 Odi Live Streaming when and where to Watch online free in Marathi)

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...