IND vs SL 2nd ODI Live : दीपक चाहरची संयमी अर्धशतकी खेळी, अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात

| Updated on: Jul 21, 2021 | 12:14 AM

India vs Sri Lanka 2nd ODI Live Score : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने 275 रन स्कोरबोर्डवर लावले आहेत. आता भारताला विजयासाठी या धावांचा पाठलाग करावा लागणार आहे.

IND vs SL 2nd ODI Live : दीपक चाहरची संयमी अर्धशतकी खेळी, अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात
IND vs SL 2nd ODI Live:

India vs Srilanka : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत विरुद्ध श्रीलंकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली आहे. दीपक चाहरने 82 चेंडूत 69 धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. तर सूर्यकुमार यादवनेदेखील (53) अर्धशतकी खेळी करत आपलं योगदान दिलं. सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहरच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेने दिलेलं 275 धावांचं आव्हान 3 विकेट्स आणि 5 चेंडू राखून पूर्ण केलं. या विजयासह भारताने उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंनी श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला होता.

(India vs Sri Lanka ODI Series 2021 Live Score today India tour of Sri Lanka 2021 2nd ODI match scorecard in marathi)

Key Events

दीपक-सूर्य तळपले

श्रीलंकन फलंदाजांनी भारताला 276 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची आज खराब सुरुवात झाली. आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ (12) तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ इशान किशन (1), शिखर धवन (29), मनिष पांडे (37) हार्दिक पंड्या (0) एका मागोमाग एक ठराविक अंतराने बाद होत गेले. परंतु सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली होती. त्याने 42 चेंडूत 52 धावा फटकावत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने 35 धावांचं योगदान दिलं. कृणाल बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र दीपक चाहरने हाती घेतली. सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गरज पडेल तेव्हा फटकेबाजी करत 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत चांगली साथ दिली.

श्रीलंकेची दिलासादायक फलंदाजी

श्रीलंकेचे सलामीवीर फलंदाज अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी उत्कृष्ठ सुरुवात करत 77 धावांची भागिदारी रचली. त्याचवेळी 14 व्या षटकात गोलंदाजीसाठी मैदानात आलेल्या चहलने दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर मिनोद आणि राजपक्षा यांना बाद करत भारताला दोन विकेट्स मिळवून दिल्या. त्यानंतर फर्नांडो (50) आणि धनंजया (32) या दोन सेट फलंदाजाच्या विकेट भुवनेश्वर कुमार आणि दिपक चहारने घेत. भारताची बाजू आणखी मजबूत केली. त्यानंतर असालंका याच्या 65 आणि करुणारत्नेच्या नाबाद 44 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 275 धावापर्यंत मजल मारली. भारताला आता विजयासाठी 276 धावांची गरज होती. हे आव्हान भारताने शेवटच्या षटकात पूर्ण केलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 20 Jul 2021 11:25 PM (IST)

    अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात

    अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत विरुद्ध श्रीलंकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली आहे. दीपक चाहरने 82 चेंडूत 69 धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. तर सूर्यकुमार यादवनेदेखील (53) अर्धशतकी खेळी करत आपलं योगदान दिलं.

  • 20 Jul 2021 10:37 PM (IST)

    भारताला सातवा झटका, कृणाल पांड्या 35 धावांवर बाद

    भारताला सातवा झटका, कृणाल पांड्या 35 धावांवर बाद

    भारताचे सात गडी बाद, 204 धावा

  • 20 Jul 2021 09:52 PM (IST)

    भारताचा सहावा गडी माघारी, सूर्यकुमार यादव 53 धावांवर बाद

    सूर्यकुमार यादवच्या रुपात भारताने सहावी विकेट गमावली आहे. 53 धावांवर असताना लक्षण संदाकन याने त्याला पायचित पकडले. (भारत 165/6)

  • 20 Jul 2021 09:42 PM (IST)

    सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, भारताची 5 बाद 159 धावांपर्यंत मजल

    ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत असताना सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली आहे. त्याने 42 चेंडूत 52 धावा फटकावत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं आहे.

  • 20 Jul 2021 09:04 PM (IST)

    भारताला पाचवा झटका, हार्दिक पंड्या शून्यावर बाद

    मनिष पांडेपाठोपाठ हार्दिक पंड्यादेखील बाद झाला आहे. पंड्याला भोपळादेखील फोडता आला नाही. (भारत 116/5)

  • 20 Jul 2021 08:46 PM (IST)

    सूर्यकुमार-मनिष पांडेकडून डाव सावरण्याचा प्रयत्न, 16 षटकात भारताचं शतक

    आघाडीचे तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडेने डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. 16 षटकात भारताने धावफलकावर 107 धावा जमवल्या आहेत.

  • 20 Jul 2021 08:25 PM (IST)

    भारताला तिसरा झटका, शिखर धवन 29 धावांवर बाद

    कर्णधार शिखर धवनच्या रुपात भारताने तिसरी विकेट गमावली आहे. 29 धावांवर असताना हसरंगाने त्याला पायचित पकडलं. (भारत 69/3)

  • 20 Jul 2021 07:56 PM (IST)

    39 धावांवर भारताला दुसरा झटका, इशान किशन 1 धाव करुन बाद

    भारताने दुसरी विकेट गमावली आहे. 39 धावांवर इशान किशन बाद झाला आहे. त्याला केवळ 1 धाव करता आली.

  • 20 Jul 2021 07:38 PM (IST)

    भारताला पहिला झटका, पृथ्वी शॉ 13 धावांवर बाद

    जलदगती गोलंदाजांची धुलाई होतेय, हे पाहून श्रीलंकने कर्णधाराने फिरकीपटूच्या हाती चेंडू दिला. सामन्यातील तिसऱ्याच षटकात हसरंगाने पृथ्वी शॉला त्रिफळाचित केलं. (भारत 28/1)

  • 20 Jul 2021 07:36 PM (IST)

    शिखर धवनचा हल्लाबोल, दुसऱ्या षटकात तीन चौकार

    पहिल्या षटकात पृथ्वी शॉ याने तीन चौकार फटकावल्यानंतर दुसऱ्या षटकात सलामीवीर शिखर धवननेदेखील तीन चौकार लगावले. दोन षटकात भारताने 26 धावा जमवल्या आहेत.

  • 20 Jul 2021 07:34 PM (IST)

    भारताची शानदार सुरुवात, पहिल्याच षटकात पृथ्वी शॉचे सलग तीन चौकार

    भारताने आजच्या सामन्यातदेखील शानदार सुरुवात केली आहे. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ याने सलग तीन चौकार लगावत पुन्हा एकदा श्रीलंकन गोलंदाजीवर हल्ला चढवला आहे. पहिल्या षटकात भारताने 14 धावा वसूल केल्या आहेत.

  • 20 Jul 2021 07:13 PM (IST)

    IND vs SL : श्रीलंकेचा डाव 275 धावांवर समाप्त

    सामन्यातील पहिल्या 50 ओव्हर्सचा खेळ संपला असून श्रीलंका संघाने स्कोरबोर्डवर 275 धावा लावल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 276 धावांची गरज आहे.

  • 20 Jul 2021 06:47 PM (IST)

    IND vs SL : श्रीलंकेचा आठवा गडी तंबूत परत

    भारताचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने आणखी एक विकेट मिळवली आहे. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये चामिरा याला बाद केले आहे. बदली खेळाडू देवदत्त पड्डीकलने चामिराचा झेल घेतला आहे.

  • 20 Jul 2021 06:39 PM (IST)

    IND vs SL : असालंका बाद, भुवीने घेतली विकेट

    भारताचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेचा सेट फलंदाज असालंका याला 48 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बाद केले आहे. बदली खेळाडू देवदत्त पड्डीकलने असालंकाची कॅच घेतली आहे.

  • 20 Jul 2021 06:22 PM (IST)

    IND vs SL : असालंकाकडून चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण

    एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना श्रीलंका संघाला सावरणाऱ्या असालंका याने भारताविरुद्ध आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले आहे. 45 व्या ओव्हरमध्ये कुलदीपला चौकार ठोकत त्याने अर्धशतक पूर्ण केले आहे.

  • 20 Jul 2021 06:00 PM (IST)

    IND vs SL : दिपक चहारचा उत्कृष्ट बॉल, श्रीलंकेचा हसनरंगा बाद

    भारताचा वेगवान गोलंदाज दिपक चहारने 40 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर उत्कृष्ठ असा स्वींग बॉल टाकत विकेट पटकावला आहे. त्याने श्रीलंकेच्या हसनरंगा याला 8 धावांवर बाद केले आहे.

  • 20 Jul 2021 05:47 PM (IST)

    IND vs SL : श्रीलंकेचा कर्णधार बाद

    श्रीलंका संघाचा कर्णधार शनाका याला बाद करत युझवेंद्र चहलने सामन्यातील तिसरा वैयक्तीक विकेट पटकावला आहे. या विकेटनंतर श्रीलंकेची स्थिती 175 वर 5 बाद झाली आहे.

  • 20 Jul 2021 05:09 PM (IST)

    IND vs SL : श्रीलंकेच्या अडचणीत वाढ, सेट फलंदाज धनंजया बाद

    श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत असलेला धनंजया डी सिल्वा 32 धावा करुन बाद झाला आहे. 27 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर दिपक चहरच्या गोलंदाजीवर कर्णधार शिखर धवनने धनंजया याचा झेल टिपला आहे.

  • 20 Jul 2021 04:55 PM (IST)

    IND vs SL : श्रीलंकेला तिसरा झटका

    नुकतंच अर्धशतक करणारा सलामीवीर फर्नांडो उपकर्णधार भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर बाद झाला आहे. कृणाले झेल पकडत श्रीलंकेला तिसरा झटका दिला आहे.

  • 20 Jul 2021 04:51 PM (IST)

    IND vs SL : सलामीवीर फर्नांडोचे अर्धशतक

    श्रीलंकेचा सलामीवीर फर्नांडो याने उत्कृष्ठ सलामीवीराची भूमिका पार पाडत अर्धशतक ठोकले आहे. त्याने 70 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले आहे.

  • 20 Jul 2021 04:40 PM (IST)

    IND vs SL : श्रीलंका संघाचे शतक

    श्रीलंका संघाने दोन विकेट गमावल्यावर पुन्हा एकदा संयमी फलंदाजी करत 100 धावांचा आकडा पार केला आहे. 22 ओव्हरनंतर 107 वर दोन बाद अशी श्रीलंकेची स्थिती आहे.

  • 20 Jul 2021 04:17 PM (IST)

    IND vs SL : चहलची हॅट्रीक थोडक्यात हुकली

    चहलने 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर लागोपाठ दोन विकेट घेतल्या. चहलचा चौथा चेंडू श्रीलंकेच्या धनंजया याने उत्कृष्ठरित्या प्लेट केल्यामुळे चहल हॅट्रीकपासून थोडक्यात हुकला.

  • 20 Jul 2021 04:11 PM (IST)

    IND vs SL : चहलला लागोपाठ दोन विकेट्स

    14 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर मिनोदला बाद केल्यानंतर चहलने लगेच तिसऱ्याच बॉलवर फलंदाजीला आलेल्या राजपक्ष याला शून्यावर बाद केलं आहे.

  • 20 Jul 2021 04:07 PM (IST)

    IND vs SL : भारताला पहिलं यश

    बऱ्याच वेळाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा युझवेंद्र चहलने भारताला पहिली विकेट मिळवून दिली आहे. 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर मिनोद हा चहलच्या बॉलवर मनिष पांडेने कॅच घेतल्यावर बाद झाला आहे.

  • 20 Jul 2021 04:03 PM (IST)

    IND vs SL : भारताकडून ‘कुल्चा’ जोडी गोलंदाजीसाठी

    श्रीलंकेच्या फलंदाजानी उत्कृष्ठ सुरुवात केली आहे. पावरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता श्रीलंका संघाने 59 धावा स्कोर बोर्डवर लावल्या आहेत. वेगवान गोलंदाजाना विकेट मिळत नसल्याने भारताने कुलदीप आणि चहल या फिरकीपटूंना मैदानात उतरवले आहे.

  • 20 Jul 2021 03:29 PM (IST)

    IND vs SL : भारताकडून गोलंदाजीत बदल

    भारताकडून उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि दिपक चहार यांनी गोलंदाजीला सुरुवात केली. मात्र श्रीलंकन खेळाडू त्यांच्या ओव्हरला जास्त धावा ठोकू लागल्याने भारताने गोलंदाजीत बदल करत अष्टपैलू हार्दीकला गोलंदाजी दिली आहे.

  • 20 Jul 2021 03:09 PM (IST)

    IND vs SL : सामन्यातील पहिला चौकार

    दुसऱ्या ओव्हरमध्ये दिपक चहारच्या पाचव्या चेंडूवर श्रीलंकेच्या मिनोद याने सामन्यातील  पहिला चौकार ठोकला आहे.

  • 20 Jul 2021 03:08 PM (IST)

    IND vs SL : थोडक्यात बचावला फलंदाज

    पहिल्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर श्रीलंकेचा सलामीवीर फर्नांडोची कॅच मनीष पांडेकडून थोडक्यात हुकली. त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला यश मिळता मिळता राहिले.

  • 20 Jul 2021 02:50 PM (IST)

    IND vs SL : बदलाव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी श्रीलंका संघ

    अविष्का फर्नांडो, मिनोड भानुका (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, दासुन शनाका (कर्णधार), वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसुन रजिथा, दुशमंथ चमीरा

  • 20 Jul 2021 02:42 PM (IST)

    IND vs SL : गोलंदाजावर पुन्हा महत्त्वाची जबाबदारी

    पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही श्रीलंका संघच नाणेफेक जिंकला आहे. त्यांनी यावेळीही फलंदाजी घेतल्याने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजाना मागील सामन्या प्रमाणे चोख गोलंदाजी करुव श्रीलंकेला कमी धावांमध्ये रोखाव लागेल. जेणेकरुन फलंदाजाला रन चेस करताना जास्त अवघड पडणार नाही.

  • 20 Jul 2021 02:40 PM (IST)

    IND vs SL team 11 : श्रीलंकन संघात एक बदल

    दुसऱ्या वन डे सामन्यासाठी श्रीलंका टीमने संघात एक बदल केला आहे,  इसुरु उडानाच्या जागी कसुन रजिथाला संधी देण्यात आली आहे. मात्र भारताने आपला संघ कायम ठेवला आहे. (Kasun Rajitha in for Isuru Udana for Sri Lanka, and no changes for India)

  • 20 Jul 2021 02:39 PM (IST)

    IND vs SL : भारतीय संघात कोणताही बदल नाही

    पहिल्या एकदिवसीय सामन्यातील 11 खेळाडूंसोबतच भारत दुसऱ्या सामन्यातही उतरणार आहे. प्रथम गोलंदाजी आल्याने भारत पुन्हा एकदा श्रीलंका संघाला छोट्या धावसंख्येत बाद करण्याचा प्रयत्न करेल.

  • 20 Jul 2021 02:35 PM (IST)

    IND vs SL : नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

    पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही टॉस श्रीलंका संघानेच जिंकला आहे. टॉस जिंकत श्रीलंकेचा कर्णधार शनाका याने प्रथम फलंदाजी करणार असल्याचे सांगितले.

Published On - Jul 20,2021 2:23 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.