IND vs SL 2nd T20: पराभवानंतर अर्शदीपवर भडकला हार्दिक पंड्या, म्हणाला, ‘हा तर….’
IND vs SL 2nd T20: पराभवानंतर हार्दिक पंड्या अर्शदीपवर इतका का खवळला? सामना संपल्यानंतर थेट म्हणाला, की....
पुणे: आधी खराब गोलंदाजी नंतर निराशाजनक फलंदाजी यामुळे टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी 20 सामना गमावला. 3 टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये श्रीलंकेने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियावर 16 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या अर्शदीप सिंहवर भडकला. हार्दिक अर्शदीपवर भडकला, त्याचं कारण आहे, नो बॉल. हार्दिकने नो बॉल हा क्राइम असल्याच सांगितलं. अर्शदीप सिंहसह भारतीय गोलंदाजांनी एकूण 7 नो बॉल टाकले. यात 5 नो बॉल एकट्या अर्शदीपने टाकले.
हार्दिक पंड्या काय म्हणाला?
उमरान मलिक आणि शिवम मावीने प्रत्येकी एक-एक नो बॉल टाकला. “पावरप्लेमध्ये आम्ही गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात खराब खेळ केला. आम्ही काही बेसिक चूका केल्या. ज्या करायला नको होत्या. तुमचा दिवस खराब असू शकतो. पण तुम्ही बेसिक्सपासून भरकटू शकत नाही. अर्शदीपने आधी सुद्धा नो बॉल टाकला होता. इथे कोणाला दोष द्यायचा नाहीय. पण नो बॉल एक क्राइम आहे” असं हार्दिक पंड्या म्हणाला.
The match went down to the wire but it is Sri Lanka who won the second T20I by 16 runs.
Scorecard ▶️ https://t.co/Fs33WcZ9ag #TeamIndia | #INDvSL pic.twitter.com/YoE4hvgZoA
— BCCI (@BCCI) January 5, 2023
अर्शदीपने लुटवल्या धावा
दुसऱ्या टी 20 सामन्यात अर्शदीप सिंहने फक्त 2 ओव्हर टाकल्या. त्याने 18.50 च्या इकोनॉमीने 37 धावा दिल्या. T20 इंटरनॅशनल मॅचमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा लज्जास्पद रेकॉर्डची अर्शदीपच्या नावावर नोंद झालीय. श्रीलंकेने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 6 विकेट गमावून 206 धावा केल्या. कुसल मेंडिसने 52 आणि दासुन शनाकाने नाबाद 56 धावा केल्या. टीम इंडियाची खराब फलंदाजी
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने खराब सुरुवात केली. 57 धावात इशान किशन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या आणि दीपक हुड्डा हे टॉप 5 फलंदाज तंबूत परतले होते. सूर्यकुमार यादवने 51 आणि अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावा फटकावून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 148 धावांवर सूर्यकुमार यादव पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर टीम इंडियाच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.