Virat Kohli चा धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट, इतक्या मीटर लांब पोहोचवला SIX, पहा VIDEO
Virat Kohli ने श्रीलंकन बॉलर्सना कुठलीही दया-माया न दाखवता त्यांची जोरदार धुलाई केली. विराटने मैदानात फोर, सिक्सचा पाऊस पाडला. त्याने मारलेल्या एका सिक्सची सुद्धा तितकीच चर्चा आहे. सेंच्युरी मारल्यानंतर त्याने तो सिक्स मारला.
तिरुअनंतपूरम: विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये धुवाधार बॅटिंग केली. त्याने श्रीलंकन बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. विराट कोहली नाबाद 166 धावांची इनिंग खेळला. त्याने आपल्या इनिंगमध्ये 13 चौकार आणि 8 षटकार लगावले. त्याने 74 व आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. या सीरीजमधील त्याची ही दुसरी सेंच्युरी आहे. त्याने 85 चेंडूत आपलं 46 व वनडे शतक पूर्ण केलं. कोहलीच्या शतकाची क्रिकेट विश्वात चर्चा सुरुच आहे. पण त्याचवेळी त्याने मारलेल्या एका सिक्सची सुद्धा तितकीच चर्चा आहे. सेंच्युरी मारल्यानंतर त्याने तो सिक्स मारला.
धोनीची आठवण
विराट कोहलीने आधी सेंच्युरी मारली. त्यानंतर 44 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर लॉन्ग ऑनच्यावरुन कमालीचा सिक्स मारला. त्याचा हा सिक्स पाहून माजी भारतीय कॅप्टन एमएस धोनीची आठवण आली.
कोहलीने किती मीटर लांब सिक्स मारला?
कोहलीने आपल्या शतकाच सेलिब्रेशन रंजिताच्या चेंडूवर हॅलिकॉप्टर शॉट मारुन केलं. त्याने जवळपास 97 मीटर लांब सिक्स मारला. या सिक्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गौतम गंभीरने त्याच्या या शॉटच कौतुक केलं. कोहलीच्या शतकापेक्षा तो सिक्स जास्त लाजवाब होता, असं गंभीर म्हणाला. माजी भारतीय कॅप्टन सिक्स मारल्यानंतर जास्त आक्रमक झाला. त्याने 100 धावा केल्यानंतर आणखी 7 सिक्स मारले.
? Mighty Maximum – a 97m SIX from Virat Kohli ??
Live – https://t.co/q4nA9Ff9Q2 #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/R3CzXTWBT5
— BCCI (@BCCI) January 15, 2023
कोहलीने तोडला सचिनचा रेकॉर्ड
कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 10 व वनडे शतक झळकावलं. कुठल्याही टीम विरोधातील हा सर्वाधिक वनडे शतकांचा रेकॉर्ड आहे. कोहली मायदेशात सर्वाधिक 21 सेंच्युरी मारणारा फलंदाज बनलाय. त्याने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला. सचिनने भारतात 20 शतक झळकावली आहेत. टीम इंडियाची विशाल धावसंख्या
कोहलीच्या 166 धावांच्या बळावर टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 390 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात श्रीलंकेची टीम 73 रन्सवर ऑलआऊट झाली. कोहलीशिवाय टीम इंडियाचा दुसरा सलामीवीर शुभमन गिलने आपलं दुसरं वनडे शतक झळकवलं. तो 116 धावांची इनिंग खेळला.