IND vs SL: 5 दिवसात ड्रायव्हरच्या मुलाचं आयुष्य बदललं, पैशांचा पाऊस, आता मिळाली निळी जर्सी
IND vs SL: दिवस बदलायला वेळ लागत नाही. नशिबाने साथ दिली तर, भरभराट होते, टीम इंडियात स्थान मिळवणारा कोण आहे तो ड्रायव्हरचा मुलगा?
नवी दिल्ली: श्रीलंकेविरुद्धच्या T20 सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झालीय. रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल. शिवम मावी आणि मुकेश कुमार हे युवा गोलंदाज टीम इंडियाकडून डेब्यु करणार आहेत. मागच्या 5 दिवसांपासून मुकेश कुमारच नाव चर्चेत होतं. कारण 5 दिवसात या खेळाडूच आयुष्य बदलून गेलय.
दिल्लीने तब्बल इतके कोटी खर्च केले
5 दिवसांपूर्वी मुकेश कुमारवर आयपीएलमध्ये पैशांचा पाऊस पडला. आता त्याची टीम इंडियात एंट्री झालीय. आयपीएलच्या लिलावात मुकेश कुमारची डिमांड होती. 20 लाख रुपये बेस प्राइस असलेल्या या खेळाडूवर सर्वच फ्रेंचायजींनी बोली लावली. मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलं. त्यासाठी दिल्लीला 5.50 कोटी रुपये खर्च करावे लागले.
मोठ्या संघर्षाचा परिणाम
मागच्या सीजनमध्ये मुकेश कुमार आयपीएलमध्ये अनसोल्ड होता. पण सरत्या वर्षात आपल्याला डबल आनंद मिळणार याची त्याला कल्पनाही नव्हती. आयपीएलमध्ये त्याच्यावर बोली लावून त्याला विकत घेतल्याचा आनंद होताच. पण आता बीसीसीआयनेही टीम इंडियात निवड करुन त्याचा आनंद द्विगुणित केलाय. एका मोठ्या संघर्षानंतर त्याला हे यश मिळालय.
#TeamIndia squad for three-match T20I series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/iXNqsMkL0Q
— BCCI (@BCCI) December 27, 2022
लष्करात जायचं होतं
बिह्रारमध्ये जन्मलेला मुकेश कुमार पश्चिम बंगालकडून क्रिकेट खेळतो. कोलकाताला जाण्याआधी त्याने लष्करात भर्ती होण्यासाठी अर्ज केला होता. पण तिथे तो यशस्वी ठरला नाही. मुकेशचे वडिल पेशाने टॅक्सी ड्रायव्हर होते. ते बंगालमध्ये रहायचे. क्लब क्रिकेटमधून सुरुवात
मुकेशने बांगालमध्ये दुसऱ्या दर्जाच्या क्लबमधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आपल्या मेहनीच्या बळावर त्याने 2015 साली बंगालच्या रणजी टीममध्ये स्थान बनवलं. फर्स्ट क्लास प्रदर्शनाबद्दल बोलायच झाल्यास, 33 सामन्यात त्याने 123 विकेट घेतल्यात. लिस्ट ए मध्ये 26 विकेट आणि टी 20 मॅचमध्ये 25 विकेट काढल्यात.