IND vs SL 1st ODI: श्रीलंकेने टॉस जिंकला, अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11
India vs Srilanka 1st ODI: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. पहिला वनडे सामना गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
India vs Srilanka 1st ODI: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. पहिला वनडे सामना गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. वनडे सीरीजच्या आधी झालेली T20 सीरीज टीम इंडियाने 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाला सहजासहजी या सीरीजमध्ये विजय मिळवता आला नाही. श्रीलंकेने चांगली टक्कर दिली. आता वनडे सीरीजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या तीन सीनियर प्लेयर्सनी टीममध्ये कमबॅक केलय. बदलेल्या फॉर्मेटमध्ये टीम इंडियासमोर वेगळं आव्हान असणार आहे.
1ST ODI. India XI: R Sharma (c), S Gill, V Kohli, KL Rahul (wk), S Iyer, H Pandya, A Patel, U Malik, Y Chahal, M Shami, M Siraj. https://t.co/MB6gfx9iRy #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 10, 2023
टॉस कोणी जिंकला?
श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ टीम इंडिया पहिली बॅटिंग करणार आहे. “आम्ही पहिली गोलंदाजी करणार. रात्री इथे दव पडणार. आम्ही ज्या पद्धतीने टी 20 सीरीज खेळलोय, त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढलाय” असं दासुन शनाका म्हणाला. सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही.
भारताची प्लेइंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक और युजवेंद्र चहल
श्रीलंकेची प्लेइंग XI: कुसल मेंडिस, पाथम निसंका, अविष्का फर्नांडो, धनंजय डी सिल्वा, चारिथ असालंका, दासुन शनका (कॅप्टन), वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, ड्यूनिथ वेलेज, कसुन रजित, दिलशान मधुशंका