Virat kohli 100 th Test match: ‘असा मी कधी विचारच…’ विराटचे प्रेरणा देणारे शब्द नक्की वाचा, पहा VIDEO
Virat kohli 100 th Test match: क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळताना कामगिरीत सातत्य ठेवणं, सोपं नाहीय. पण विराटने प्रचंड मेहनतीने हे साध्य करुन दाखवलं आहे.
मोहाली: माजी कर्णधार आणि भारताचा अव्वल क्रिकेटपटू विराट कोहली (Virat kohli) उद्या मोहालीच्या मैदानावर 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. विराटच्या करीयरमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा सामना त्याच्यासाठी खूप खास आहे. कारण 100 व्या कसोटीपर्यंत (100th Test match) पोहोचताना त्याने अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. सध्या विराटचा पडता काळ सुरु आहे. त्याच्यावर टीका होतेय. मागच्या अडीचवर्षांपासून विराटच्या बॅटमधून शतक निघालेलं नाही. त्यामुळे देशभरातील क्रिकेट चाहते विराटच्या शतकाच्या प्रतिक्षेत आहे. मोहालीच्या मैदानावर (Mohali test) शतकाची प्रतिक्षा संपेल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 70 शतकं झळकावली आहेत. यात 43 शतकं वनडेमध्ये तर 27 शतकं कसोटीमध्ये झळकावली आहेत. विराट वनडे, टेस्ट आणि टी-20 प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करतो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळताना कामगिरीत सातत्य ठेवणं, सोपं नाहीय. पण विराटने प्रचंड मेहनतीने हे साध्य करुन दाखवलं आहे.
कधी विचारच केला नव्हता
विराटने त्याच्या 100 व्या टेस्टच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय टीव्हीला मुलाखत दिली. त्यात तो आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासाबद्दल व्यक्त झाला आहे. “प्रामाणिकपणे सांगतो, मी 100 कसोटी सामने खेळीन याचा कधी विचारच केला नव्हता. हा खूप मोठा प्रवास आहे. 100 कसोटीपर्यंत पोहोचताना मी बरंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलोय. मी 100 व्या टेस्टपर्यंत पोहोचलो, यासाठी आभारी मानतो” असं विराटने सांगितलं.
असा विचार मी कधी केला नाही
“देव खूप दयाळू आहे. मी माझ्या फिटनेसवर मेहनत घेतलीय. हा क्षण माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी खास आहे. माझे कोचही आनंदी आहेत. त्यांना अभिमान वाटतो” असं विराट म्हणाला. “कमी धावा करायच्या असा मी कधी विचारच केला नाही. जास्तीत जास्त धावा करायच्या हाच विचार कायम केला. प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्याआधी ज्यूनियर स्तरावर सात ते आठ शतक झळकवली” असं विराटने सांगितलं.
‘I never thought i’ll play 100 Test matches. It has been a long journey. Grateful that i’ve been able to make it to 100’ – @imVkohli on his landmark Test.
Full interview coming up on https://t.co/Z3MPyesSeZ. Stay tuned! #VK100 pic.twitter.com/SFehIolPwb
— BCCI (@BCCI) March 3, 2022
तुमच्या क्षमतेची चाचणी होते.
“शक्य असेल तितकी, जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करायची हाच विचार होता. मैदानावर दीर्घकाळ फलंदाजी करण्याचा मी नेहमीच आनंद घेतो. मी एक-एक सत्र फलंदाजी करतो. संघासाठी सामना जिंकायचा. पॉईंट मिळवण्याचा, आघाडी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असतो. यातून तुमच्या क्षमतेची चाचणी होते. मी याचा आनंद घेतो. कसोटी क्रिकेट जिवंत रहाणं आवश्यक आहे. लोकांनी याचा अनुभव घेतला पाहिजे. माझ्यासाठी हे खरं क्रिकेट आहे” असं विराट म्हणाला.
संबंधित बातम्या: Mumbai Indians IPL 2022: खेळाडूंसाठी अख्खं फाईव्ह स्टार हॉटेल केलं बुक, 13 हजार चौरस मीटरमध्ये उभारला ‘MI Arena’ IPL 2022: ना धोनी, ना विराट-रोहित… हा भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार, कारण ऐकून तुम्हीही हसाल IND vs BAN Head to Head Records, Women’s World Cup 2022: भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात कोणाचं पारडं जड?