IND vs SL: विराटसोबत सेल्फी काढणं त्या चौघांना चांगलचं महाग पडलं, पोलिसांनी त्या मुलांसोबत काय केलं?

IND vs SL:  भारत आणि श्रीलंकेत (India vs Sri Lanka) बंगळुरुमध्ये दुसरा डे-नाइट कसोटी सामना (Bengaluru Day Night Test) सुरु आहे. या कसोटी दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रेक्षकांचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे.

IND vs SL: विराटसोबत सेल्फी काढणं त्या चौघांना चांगलचं महाग पडलं, पोलिसांनी त्या मुलांसोबत काय केलं?
बंगळुरु कसोटी दरम्यान चाहत्याने विराट कोहलीसोबत काढला फोटो Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 4:56 PM

बंगळुरु: भारत आणि श्रीलंकेत (India vs Sri Lanka) बंगळुरुमध्ये दुसरा डे-नाइट कसोटी सामना (Bengaluru Day Night Test) सुरु आहे. या कसोटी दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रेक्षकांचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. चार वर्षानंतर बंगळुरुमध्ये कसोटी सामना होत आहे. प्रेक्षकांना कुठल्याही प्रतिबंधाशिवाय स्टेडियममध्ये उपस्थित रहाण्याची परवानगी मिळाली आहे. सामन्या दरम्यान आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना डोळ्यासमोर पाहून काही प्रेक्षकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यामुळे आता ते कायदेशीर कचाटयात अडकले आहेत. बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्यादिवशी चार प्रेक्षकांनी मैदानात घुसून विराट कोहली सोबत फोटो काढण्याचा (Fans Photo with Virat Kohli) प्रयत्न केला. यामध्ये एक-दोघे यशस्वी ठरले. पण पोलिसांनी आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

किती जण सेल्फी काढू शकले?

रविवारी 13 मार्चला मॅचच्या दुसऱ्यादिवशी दिवसाचा खेळ संपत आलेला असताना ही घटना घडली. त्यावेळी श्रीलंकेचा दुसरा डाव सुरु झाला होता. क्रीजवर दिमुथ करुणारत्ने आणि कुशल मेंडीसची जोडी होती. मेंडीसला दुखापत झाल्याने वैद्यकीय तपासणी सुरु असल्याने खेळ थांबला होता. तीच संधी साधून 3-4 तरुण मैदानात घुसले व विराट कोहलीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघांना कोहलीसोबत सेल्फी काढण्याची संधी मिळाली. पण बाकीचे यशस्वी ठरले नाहीत. सुरक्षारक्षक मागे लागल्यानंतर मैदानात थोडी पळापळ झाली. त्यानंतर या चौघांना पकडण्यात आलं.

IPC आणि महामारी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

बंगळुरु सिटी पोलिसांनी या चारही युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पकडलेल्या चारही युवकांना तात्काळ स्टेडियम बाहेर काढण्यात आले. चौघांपैकी दोन अल्पवयीन मुलं आहेत. पोलिसांना त्यांच्याविरोधात IPC धारा 447, 269 आणि 271 कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अशी आहे परिस्थिती

भारतीय टीमने रविवारी आपला दुसरा डाव 303 धावांवर घोषित केला. श्रीलंकेसमोर विजयासाठी 447 धावांचे अवघड लक्ष्य ठेवलं आहे. दुसऱ्याडावात श्रीलंकेने एक विकेट गमावला. तिसऱ्यादिवशी पहिल्या सेशनमध्ये श्रीलंकेने चांगल्या सुरुवातीनंतर तीन विकेट गमावल्या. कर्णधार दिमुथ करुणारत्ने अर्धशतक झळकवून खेळत आहे. कुशल मेंडिस 54 धावांवर बाद झाला.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.