IND vs WI 1st ODI: भारताची दमदार सुरुवात, शुभमन गिलने संधीचं सोन केलं

IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना हा निर्णय योग्य ठरवता आला नाही.

IND vs WI 1st ODI: भारताची दमदार सुरुवात, शुभमन गिलने संधीचं सोन केलं
shubhaman-gillImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 8:51 PM

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु झाली आहे. क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर या सीरीज मधला पहिला सामना सुरु आहे. वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना हा निर्णय योग्य ठरवता आला नाही. कॅप्टन शिखर धवन (Shikhar dhawan) आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली. 10 षटकांच्या पहिल्या पावरप्ले मध्येच भारताने बिनबाद 73 धावा फटकावल्या. धवन आणि गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. शुभमन गिल 64 धावांवर रनआऊट झाला. त्याने 53 चेंडूत 64 धावा फटकावल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकार होते.

शिखर धवन मैदानात

शिखर धवन अजूनही खेळपट्टीवर असून त्याने 60 चेंडूत 57 धावा फटकावल्या. यात 9 फोर आणि 1 सिक्स आहे. 20 षटकात भारताच्या एक बाद 127 धावा झाल्या. धवन आणि गिलने परदेशातील खेळपट्टीवर खेळत असूनही अगदी सहज फलंदाजी केली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. सीनियर खेळाडूंना विश्रांती दिल्यामुळे या मालिकेत शुभमन गिलला संधी मिळाली आहे. त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. शिखर धवन आणि श्रेयस अय्यरची जोडी मैदानात आहे.

इंग्लंडमध्ये मिळवलं यश

विजयाने सीरीजची सुरुवात करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. भारताचा संघ इंग्लंडचा दौरा आटोपून वेस्ट इंडिज मध्ये दाखल झालाय. इंग्लंड दौऱ्यात टीन इंडियाने एजबॅस्टनचा एकमेव कसोटी सामना गमावला. पण टी 20 आणि वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी थोडा वेगळा संघ आहे. टीम इंडियातील सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या हे भारताचे प्रमुख खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.

या मालिकेसाठी भारताचं नेतृत्व शिखर धवनच्या हाती आहे. दुसऱ्यांदा शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. मागच्यावर्षी श्रीलंका दौऱ्यात त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मात्र, पहिल्या वनडेआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. जडेजाला वनडे मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण, तो जखमी झाला आहे. यामुळे तो संघाच्या इनडोअर सराव सत्रातही सहभागी झाला नाही. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकलेले नाही, पण ज्या पद्धतीने तो सराव सत्रात सहभागी झाला नाही. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो खेळत नाहीय, त्याच्याजागी शुभमन गिलला संधी मिळाली आहे.

पाऊस व्यत्यय आणेल का?

भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठरल्यावेळेला 7 वाजता सामना सुरु होईल. पण एकतासाने 8 वाजता पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस किती वेळासाठी पडेल, हे त्यावेळीच समजेल. पाऊस त्यावेळी थांबला, तरी पुन्हा अडीच-तीन तासांनी कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे आजच्या सामन्यासाठी सामना कुठल्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावा, यासाठी चाहत्यांना प्रार्थना करावी लागेल.

क्वीन्स पार्क ओव्हलवर भारताचा रेकॉर्ड

क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर नेहमीच भारताचा चांगला रेकॉर्ड राहिला आहे. वेस्ट इंडिज नंतर या मैदानावर भारतानेच सर्वाधिक वनडे सामने खेळले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त सामने जिंकलेही आहेत. टीम इंडिया या मैदानावर एकूण 21 वनडे सामने खेळली आहे. त्यात 11 सामने जिंकलेत, 9 सामन्यात पराभव झाला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

भारताची प्लेइंग 11

भारतः शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.