IND vs WI 1st ODI Match Live Streaming: भारत वेस्ट इंडिजला भिडणार, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता पहिला वनडे सामना

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला (India West indies Tour) शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आधी तीन वनडे सामन्यांची सीरीज त्यानंतर पाच टी 20 सामन्यांची (T 20 Series) मालिका होईल.

IND vs WI 1st ODI Match Live Streaming: भारत वेस्ट इंडिजला भिडणार, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता पहिला वनडे सामना
team india
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 4:11 PM

मुंबई: भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला (India West indies Tour) शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आधी तीन वनडे सामन्यांची सीरीज त्यानंतर पाच टी 20 सामन्यांची (T 20 Series) मालिका होईल. भारतीय संघ या सीरीज मध्ये दमदार कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. संघातील काही स्टार खेळाडूंना वनडे सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचं नेतृत्व करणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांना या मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने या दौऱ्यासाठी 16 सदस्यीय संघाची निवड केली होती. सर्व वनडे सामने पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळले जाणार आहेत.

वेस्ट इंडिजच्या संघात होल्डरचं पुनरागमन

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जेसन होल्डरचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजने या सीरीजसाठी 13 सदस्यीय संघाची निवड केलीय. जेसन होल्डर अनुभवी ऑलराऊंडर खेळाडू आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश केला नव्हता. पण भारताविरुद्धच्या सीरीजसाठी त्यांची संघात निवड केलीय. भारताविरुद्ध जेसन होल्डरने नेहमीच सरस खेळ केलाय. याच कारणामुळे त्याची निवड करण्यात आली आहे.

IND vs WI: कधी, कुठे आणि कसा पाहू शकता पहिला वनडे सामना

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला वनडे सामना कुठे होणार?

भारत आणि वेस्टइंडीज मध्ये पहिला वनडे सामना त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओवल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला वनडे सामना कधी खेळला जाणार?

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला वनडे सामना 22 जुलैला शुक्रवारी खेळला जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला वनडे सामना कधी सुरु होणार?

भारत आणि वेस्टइंडीज मध्ये पहिला वनडे सामना संध्याकाळी 07:00 वाजता सुरु होईल. मॅचचा टॉस संध्याकाळी 06:30 वाजता होईल.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला वनडे सामना LIVE कुठे पाहता येईल?

भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या वनडे सामन्याचं लाइव्ह कव्हरेज डीडी स्पोर्ट्स वर पाहता येईल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.