IND vs WI 1st ODI Match Preview: ओपनिंगसाठी धवन-द्रविड जोडीकडे तीन पर्याय, वनडे मध्ये घातक गोलंदाजाचा डेब्यु?

IND vs WI 1st ODI Match Preview: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये 22 जुलैपासून वनडे सीरीज (ODI Series) सुरु होत आहे. तीन सामन्यांची ही मालिका म्हणजे युवा खेळाडूंसाठी एक चांगली संधी आहे.

IND vs WI 1st ODI Match Preview: ओपनिंगसाठी धवन-द्रविड जोडीकडे तीन पर्याय, वनडे मध्ये घातक गोलंदाजाचा डेब्यु?
team india Image Credit source: bcci
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 4:10 PM

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये 22 जुलैपासून वनडे सीरीज (ODI Series) सुरु होत आहे. तीन सामन्यांची ही मालिका म्हणजे युवा खेळाडूंसाठी एक चांगली संधी आहे. अनेक सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची चांगली संधी आहे. या मालिकेमुळे भारताची बेंच स्ट्रेंथ आणखी मजबूत होणार आहे तसेच सक्षम पर्यायी खेळाडू सुद्धा या मालिकेतून गवसू शकतात. फेब्रुवारीत वेस्ट इंडिजचा संघ (West Indies Team) तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. यावर्षी टी 20 चा वर्ल्ड कप होणार आहे. वनडे क्रिकेटचं महत्त्व थोडं कमी झालं आहे. सध्या फक्त वनडे सीरीज मध्ये खेळणाऱ्या शिखर धवनला दुसऱ्यांदा संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या वनडे सीरीजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी सारख्या खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

ओपनिंगला कोण येणार?

उद्या पहिल्या वनडेत कॅप्टन शिखर धवनसोबत सलामीला कोण येणार? त्याची उत्सुक्ता आहे. शुभमन गिलच संघात पुनरागमन झालं आहे. पण शुभमन गिलशिवाय इशान किशन, ऋतुराज गायकवाड सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा सलामीला पाठवलं जाऊ शकतं. संघ व्यवस्थापनाला मधल्याफळीतील फलंदाजांची निवड करण्यासाठी थोडा विचार करावा लागेल. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये असलेल्या दीपक हुड्डाला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं जाईल. सूर्यकुमार यादवची सुद्धा अंतिम 11 मध्ये निवड निश्चित आहे. संघ व्यवस्थापनाला श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यापैकी एकाची निवड करावी लागेल. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूर भारताकडून वेगवान गोलंदाज आणि ऑलराऊंडरचा पर्याय असेल.

अर्शदीप सिंह वनडे मध्ये डेब्यु करणार ?

खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत युजवेंद्र चहल आणि रवींद्र जाडेजा तिन्ही सामने खेळू शकतात. अक्षर पटेलचा तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून पर्याय आहे. दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीज मध्ये अर्शदीप खेळला नव्हता. पण शुक्रवारी वेस्ट इंडिज विरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीचा भार असेल. वेस्ट इंडिजने अलीकडे वनडे मध्ये चांगली कामगिरी केलेली नाही.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.