IND vs WI: निकोलस पूरन-पॉवेलची फटकेबाजी व्यर्थ, रोमांचक सामना भारताने आठ धावांनी जिंकला
IND vs WI: शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताने अखेर वेस्ट इंडिजवर (India vs West indies) आठ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने टी 20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
कोलकाता: शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताने अखेर वेस्ट इंडिजवर (India vs West indies) आठ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने टी 20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोव्हमॅन पॉवेलने शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. त्याने 36 चेंडूत 68 धावा केल्या. यात चार चौकार आणि पाच षटकार लगावले. वेस्ट इंडिजने निर्धारीत 20 षटकात तीन बाद 178 धावा केल्या. हर्षल पटेल (Harshal patel) आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar kumar) शेवटच्या तीन षटकात हुशारीने गोलंदाजी केली. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला. निकोलस पूरन आणि रोव्हमॅन पॉवेलची जोडी मैदानावर फटकेबाजी करत होती, त्यावेळी वेस्ट इंडिज हा सामना सहज जिंकणार असे वाटत होते. पण शेवटच्या तीन षटकात खेळ बदलला.
निकोलस पूरनची दुसरी हाफ सेंच्युरी
निकोलस पूरनने सलग दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं. त्याने 41 चेंडूत 62 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने स्लोवर वन चेंडूवर निकोलस पूरनला बिश्नोईकरवी झेलबाद केले. त्याने पाच चौकार आणि तीन षटकार लगावले. वेस्ट इंडिजकडे पॉवर हिटर फलंदाज आहेत. आज त्याची प्रचिती आली. या दोघांच्या फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाज हतबल दिसले.
ऋषभ पंत-वेंकटेश अय्यरची तुफान फटकेबाजी
तत्पूर्वी भारताने विराट कोहली (52), ऋषभ पंत नाबाद (52) आणि वेंकटेश अय्यरच्या (33) धावांच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले. विराट कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि वेंकटेश अय्यर जोडीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यांनी विंडिजच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं. पंतने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने 28 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली. यात सात चौकार आणि एक षटकार होता. वेंकटेश अय्यरने 18 चेंडूत 33 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार होता. दोघांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अजिबात दाद दिली नाही.
विराट बाद झाल्यानंतर धावगती कुठे धीमी होणार नाही, याची दोघांनी काळजी घेतली. पाचव्या विकेटसाठी त्यांनी 76 धावांची भागीदारी केली. आज विराटने सुद्धा दमदार खेळ दाखवला. 41 चेंडूत 52 धावांची खेळी करताना विराटने सात चौकार आणि एक षटकार लगावला. विराटच्या आजच्या फलंदाजीमध्ये जुन्या कोहलीची झलक पहायला मिळाली. विराटच्या बॅटमधून बरसणाऱ्या धावा पाहून डोळ्याचं पारण फिटलं. विराटने आज सुरुवातीपासून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.
India vs west indies 2 T 20 Match Eden gardens india beat west indies