IND vs WI 2nd ODI Match Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज दुसरी वनडे, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना
IND vs WI 2nd ODI Match Live Streaming: भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला (India West indies Tour) शुक्रवारपासून सुरुवात झाली. आधी तीन वनडे सामन्यांची सीरीज त्यानंतर पाच टी 20 सामन्यांची (T 20 Series) मालिका होईल.
मुंबई: भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला (India West indies Tour) शुक्रवारपासून सुरुवात झाली. आधी तीन वनडे सामन्यांची सीरीज त्यानंतर पाच टी 20 सामन्यांची (T 20 Series) मालिका होईल. भारतीय संघ या सीरीज मध्ये दमदार कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. शुक्रवारी पहिला वनडे सामना झाला. या मॅच मध्ये भारताने 3 धावांनी वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. भारताकडे आता मालिकेत 1-0 अशी आघाडी आहे. रविवारी दुसरा वनडे सामंना होणार आहे. संघातील काही स्टार खेळाडूंना वनडे सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचं नेतृत्व करत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांना या मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. सर्व वनडे सामने पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळले जाणार आहेत.
IND vs WI: कधी, कुठे आणि कसा पाहू शकता दुसरा वनडे सामना
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा वनडे सामना कुठे होणार?
भारत आणि वेस्टइंडीज मध्ये दुसरा वनडे सामना त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओवल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा वनडे सामना कधी खेळला जाणार?
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा वनडे सामना 24 जुलैला रविवारी खेळला जाणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा वनडे सामना कधी सुरु होणार?
भारत आणि वेस्टइंडीज मध्ये दुसरा वनडे सामना संध्याकाळी 07:00 वाजता सुरु होईल. मॅचचा टॉस संध्याकाळी 06:30 वाजता होईल.
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा वनडे सामना LIVE कुठे पाहता येईल?
भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या वनडे सामन्याचं लाइव्ह कव्हरेज डीडी स्पोर्ट्स वर पाहता येईल.