IND vs WI 2nd ODI Match Preview: भारताची टॉप ऑर्डर सुसाट, पण मधल्याफळीचं टेन्शन
भारताने पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर (IND vs WI) निसटता विजय मिळवला. आता त्यांची नजर मालिका विजयावर असेल. रविवारी दोन्ही संघांमध्ये दुसरा वनडे सामना (ODI Match) होणार आहे.
मुंबई: भारताने पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर (IND vs WI) निसटता विजय मिळवला. आता त्यांची नजर मालिका विजयावर असेल. रविवारी दोन्ही संघांमध्ये दुसरा वनडे सामना (ODI Match) होणार आहे. मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. यजमान वेस्ट इंडिज सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. निकोलस पूरनच्या (Nicholas Pooran) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिजकडे मालिकेत पुनरागमन करण्याची ही शेवटची संधी आहे.
मोहम्मद सिराजने संभाळली जबाबदारी
भारताने पहिला वनडे सामना 3 धावांनी जिंकला होता. उद्या जिंकल्यास कॅरेबियाई भूमीवर भारताचा हा दुसरा विजय असेल. भारतीय संघाने काल फलंदाजीच्या विभागात दमदार कामगिरी केली. कॅप्टन शिखर धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर अर्धशतक फटकावली. टॉप ऑर्डरने मजबूत पाया रचला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने सीनियर वेगवान गोलंदाज म्हणून उत्तम कामगिरी केली. त्यामुळेच भारताला विजयी सुरुवात करत आली. मालिकेत आता भारत 1-0 ने आघाडीवर आहे.
गिलने संधीचा फायदा उचलला
शुभमन गिलला जवळपास दीड वर्षानंतर भारतीय वनडे संघात स्थान मिळालं. त्याने संधीचा फायदा उचलला व 64 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन असूनही त्याला प्राधान्य देण्यात आलं होतं. त्याचा त्याने व्यवस्थित फायदा उचलला. क्वीन्स पार्क ओव्हलची खेळपट्टी गिल फलंदाजी करताना खूप सोपी वाटत होती. अन्य फलंदाज या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसले.
संजू सॅमसन फलंदाजीत अपयशी
श्रेयस अय्यरने अर्धशतक फटकावून फॉर्म मध्ये परतण्याचे संकेत दिले. टॉप ऑर्डरच्या तिन्ही फलंदाजांनी परफेक्ट सुरुवात दिली. पण मधली फळी ढेपाळली. त्यामुळे सात विकेट गमावून फक्त 308 धावा केल्या. एकवेळ भारतीय संघ 350 च्या पुढे जाईल असं वाटतं होतं. मधल्याफळीत संजू सॅमसन अपयशी ठरला. त्याला संधीचा फायदा उचलता आला नाही. त्याने 18 चेंडूत 12 धावा केल्या.
भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ
भारत: शिखर धवन (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.
वेस्टइंडीज: निकोलस पूरन (कॅप्टन), शे होप (उपकॅप्टन), शमराह ब्रूक्स, कीसी कार्टी, जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, कीमो पॉल, रोवमॅन पॉवेल आणि जेडन सील्स.